Aneet Padda now in OTT: 'सैयारा' चित्रपटाच्या जबरदस्त यशामुळे, अभिनेत्री अनित पद्ढा रातोरात सुपरस्टार बनली. आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या दणदणीत यशामुळे तिला प्रचंड ऑफर येऊ लागले आहेत. 'सैयारा' मधील तिचे नैसर्गिक सौदंर्य आणि उत्तम अभिनयाने तिने अल्पावधीतच सर्वांचे लक्ष वेधले असून, आता ही अभिनेत्री ओटीटीवरही आपले नशीब आजमावणार आहे.
'सैयारा' फेम अनित पद्ढाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूड पदार्पणातच घवघवीत यश मिळाल्यामुळे ती देखील प्रचंड खुश आहे. मात्र यानंतर पुढे काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तर या संदर्भात अनित पद्ढा विषयी एक बातमी समोर आली आहे, ती लवकरच ओटीटीवरही तिच्या अभिनयाची जादू दाखवणार आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फातिमा सना शेख अनित पद्ढासोबत 'न्याय' या वास्तविक आधारित सिरीजमध्ये ती दिसणार आहे. गेल्या वर्षी चित्रित झालेला हा शो लवकरच एका प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण प्रत्येकाच्या मनात प्रश्न असा आहे की जर पहिला चित्रपट सुपरहिट झाला असेल तर अनित ओटीटीकडे का वळत आहे? हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सूत्रांनी सांगितले की, अनितचा हा प्रकल्प सैय्यारा चित्रपट साइन करण्यापूर्वीच चित्रित करण्यात आला होता.
'न्याय'ची कथा काय आहे?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'न्याय' ही एका तरुणीची कथा आहे जिचे एका शक्तिशाली धार्मिक नेत्याकडून लैंगिक शोषण होते आणि ती त्याच्याविरुद्ध न्यायालयात लढा देते. या सिरीजमध्ये, अनित एका १७ वर्षीय पीडितेची भूमिका साकारत आहे, जी केवळ समाजाच्या दबावाशीच झुंजत नाही तर कायदेशीर समस्यांचाही सामना करते.
'न्याय'चे दिग्दर्शन नित्या मेहरा आणि करण कपाडिया यांनी केले आहे. नित्याने यापूर्वी 'बार बार देखो' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अनितचे चाहते आता त्याला ओटीटीवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
सैयारा चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
सैयारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. त्याची कमाई सतत वाढत आहे आणि आता या चित्रपटाने आपल्या नावावर एक नवा विक्रमही केला आहे. सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने त्याच्या ९ व्या दिवशी सुमारे २६.५ कोटींचा निव्वळ कलेक्शन केला आहे. त्यानंतर त्याची कमाई २१७.२५ कोटींवर पोहोचली आहे. 'सैयारा' हा या वर्षातील दुसरा चित्रपट आहे जो अधिकृतपणे २०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.