पनवेल एसटी डेपोच्या विकासकामांना गती द्या , मनमानी करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा : आमदार विक्रांत पाटील

  65

B.O.T. कडून काम होत नसेल तर शासनाकडे सुपूर्द करा


पनवेल : पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या पनवेलचे भौगोलिक महत्त्व हे फार मोठे आहे व अनेक वर्षांपासून पनवेल बस डेपो येथून हजारो एसटी बसेसची वाहतूक होत असते. पनवेल बस डेपो मधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करत असतात . अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था फार दयनीय झालेली आहे.

B.O.T. तत्त्वावरती या बस डेपोच्या विकासाचे काम हे एका कंत्राटदाराला दिले होते . परंतु सुरुवातीपासूनच या कंत्राटदाराने कामामध्ये दिरंगाई केली . आता काही तांत्रिक अडचणीमुळेही हा प्रकल्प धीम्या गतीने सुरू आहे. आमदार विक्रांत पाटील यांनी वेळोवेळी या विषयाचा पाठपुरावा करत, अधिवेशन काळात या विषयाची विशेष चर्चा घडवून आणली होती. या विषयाची एक विस्तृत बैठक सुद्धा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. परंतु अजूनही या विषयात काही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.

पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे. B.O.T. तत्वावर जर हा प्रकल्प पूर्ण करणे शक्य होत नसेल व त्यामध्ये प्रकल्पाच्या उंचीचे कारण दाखवत पर्यावरण खात्याकडून काही अडचणी असतील, तर या प्रकल्पाचे स्वरूप तात्काळ बदलावे व B.O.T. ऐवजी शासनाकडून या प्रकल्पाला पुढे नेण्याकरिता प्रयत्न करावे, जेणेकरून प्रकल्पाच्या उंचीचा प्रश्न हा निकाली निघू शकेल व प्रकल्प पूर्ण होऊ शकेल, असे आमदार विक्रांत पाटील म्हणाले. ते पनवेल एसटी डेपो येथे एका लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

नवीन बसचे लोकार्पण


पनवेल बस डेपो येथे पाच नवीन बसचे लोकार्पण आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लांब पल्ल्यासाठी पाच नवीन बस सेवेत दाखल झाल्या.
Comments
Add Comment

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

रणबीर-आलियाच्या नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आलिया संतापली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत एक नवं घर बांधत आहेत, ज्याची किंमत

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना

मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय