कल्याण परिसरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्ती आणि महावितरणचे वीज मीटर जोडणीचे काम मंगळवारी करावयाचे आहे.


या कामांसाठी मोहिली जलशुध्दीकरण केंद्र येत्या मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या कल्याण शहराचा काही भाग ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा मंगळवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली.


मोहिली जलशुद्धीकरण केंद्र उल्हास नदीच्या काठावर मोहिली गाव हद्दीत आहे. या केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या मांडा, टिटवाळा, बल्याणी, बनेली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि परिसरातील ग्रामीण भागातील काही गावे, याशिवाय कल्याण पश्चिमेतील 'ब' प्रभाग हद्दीतील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा काॅलनी परिसर, मुरबाड रस्ता, सिंडिकेट परिसराला होणारा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.


त्याचप्रमाणे दुरुस्तीच्या कामाच्यावेळी महावितरणकडून मोहिली जलशुध्दीकरण मीटर युनिट बसावयाचे आहेत. दिवसभरात किती पाणी उचलले, शुध्द केले याची मोजणी या मीटरच्या माध्यमातून केली जाते. ही अत्यावश्यक कामे मोहिली जलशुध्दीकरण केंद्रात करावयाची असल्याने मंगळवारी कल्याण शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण पूर्व, डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा नियमित सुरू राहणार आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या