मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ : पाणीसाठा ९१ टक्क्यांवर

पुणे : राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये सुरु असलेल्या तुफान पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणांत एकूण ९१ टक्के पाणीसाठी आहे. वरसगाव धरण ९४ टक्के भरल्याने ६३८.२० क्यूसेकचा पाणी विसर्ग सुरू आहे. मुठा नदीत शनिवारी दुपारी १६७२ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला. त्यामुळे एकूण २२७२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत होत आहे. हे पाणी खडकवासला धरणात येत असल्याने तेथून दुपारी ३ वाजता १७१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू केला आहे. यामुळे नदीकाठच्या भागाला दक्षतेचा इशारा दिला आहे.


दोन दिवसांपासून पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला पाणलोट क्षेत्रात जओरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाटयाने वाढ होत आहे. वरसगाव धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. या धरणाची साठवण क्षमता १२.५० टीएमसी असून सध्या तेथे ११.५० टीएमसी पाणी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वीज निर्मिती केंद्र सुरू केले असून त्यासाठी ६०० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. साडेदहा टीएमसी साठवण क्षमता असलेले पानशेत धरणाचा पाणीसाठी शनिवारी ९१ टक्के झाला असून धरणात सध्या ९.२३ टीएमसी पाणीआहे. वरसगाव, पानशेत धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरणात येते. पूरस्थिती उद्भवू नये म्हणून यंदा पाटबंधारे विभागाकडून आधीच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. तेथे ७५ टक्के पाणी आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास तसेच वरसगाव, पानशेतचा विसर्ग वाढल्यास खडकवासला मधील विसर्ग वाढेल त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या भागात दक्षतेचा इशारा दिला आहे.



सध्य स्थितीतील धरणातील पाणीसाठा
खडकवासला - ७५ टक्के
पानशेत - ९१ टक्के
वरसगाव - ९४ टक्के
टेमघर - ८५ टक्के
एकूण - ८७ टक्के

Comments
Add Comment

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या