मुंबई (प्रतिनिधी) :एकीकडे गणपती उत्सव जवळ येत असताना गणेशोत्सव काळात एसटी महामंडळाच्या बसने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे विघ्न काही संपता संपल्याचे दिसत नाही. एसटी महामंडळाने अन्यायकारक लादलेल्या ३० टक्के बस भाडे विरोधात संतप्त प्रतिक्रिया उलटू लागल्यानंतर ते बस भाडे कमी करण्याची नामुष्की एसटी महामंडळावर आली.
मात्र आता एसटी महामंडळाने दुसऱ्या दाराने प्रवाशांवर बस भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय परस्पर घेतला आहे. या बस भाडेवाढीनुसार मुंबई ठाण्याहून कोकणात गेलेल्या बस गाडीचे तेथील नजीकच्या आगारापर्यंतचे परतीचे भाडे आता एसटी महामंडळ प्रवाशांकडून वसूल करणार आहे. त्यामुळे एका दाराने बंद केलेली बस भाडेवाढ मागील दाराने लादली गेली असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्पात येत आहे
याबाबत गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण म्हणाले कि हो भाडेवाढ अन्यायकारक असून प्रवाशांना दुप्पट भुर्दंड देणारी आहे यापूर्वी अशी छुपी भाडेवाढ करण्यात आली नव्हती.
मुंबई, ठाणे, पालघर परिसरातून कोकणात गाव तालुका वाड्यांमध्ये एसटी बसचे समूह आरक्षण केले जाते. यापूर्वी फक्त तेवढेच बस भाडे प्रवाशांकडून वसूल केले जात होते, मात्र आता एसटी बस आपल्या नियोजित ठिकाणी प्रवाशांना सोडल्यानंतर जवळच्या आगारापर्यंत रिकामी बस नेताना प्रत्येक प्रवाशामागे तिकीट वसुली केली जाणार आहे. एसटीतील अधिकारी वर्ग गणेशोलावात जाणाऱ्या कोकणवासीयांच्या मार्गात अडथळय ठरत असल्याचा आरोप करत आहे.
ज्या प्रमाणे संघटित होऊन आपण ३० टक्के अन्यायकारक दरवाढ रद्द केली त्याच्यामागे आपण याचा शासनदरबरी पाठपुरावा करणार असून सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेणार आहोत, मात्र यात समूह आरक्षण स्थगित करण्यात आल्यामुळे कोकणवासीय प्रवासात अस्वस्थता वाढली आहे.- दीपक यव्हाण, गणेशभका कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष