धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाल्याने माणिकराव कोकाटेंचे मंत्रीपद धोक्यात! अजित पवार काय म्हणाले?

अहिल्यानगर: वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे रमी प्रकरण राजकारणात चांगलेच तापले आहे. विरोधक त्यावरून कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असताना, इथे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून (Santosh Deshmukh Murder Case) क्लीनचीट मिळाल्यामुळे त्यांचा मंत्रीमंडळात पुन्हा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोकाटे यांना बाहेरचा रस्ता दाखवून त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना घेतले जाणार का? अशी विचारणा केली जात आहे. मात्र याबद्दल कोण निर्णय घेणार? यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यानगरमध्ये प्रतिक्रिया दिली.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राहुरी येथे अरुण तरपुरे यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ते मेळाव्यानंतर अहिल्यानगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरणासाठी आणि क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले पुतळा उभारणीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अजित पवार आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. ज्यात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत आपले स्पष्ट मत सांगितले



धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत अजित पवार यांचे स्पष्ट मत


धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक विधान करत निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टोलावला. तसेच वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वरील कारवायाच्या निर्णयाबाबतही मुख्यमंत्री फडणवीसच निर्णय घेतील, असे सांगून कोकाटेंवर कारवाई होणार की, अभय मिळणार याची उत्सुकता देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवली.


धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा भाजप (BJP) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होण्याच्या चर्चांचा जोर आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, "याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतात. मी याबाबत एवढेच बोललो आहे की, त्यांच्या संदर्भात न्यायालयीन व राज्य सरकार मार्फत चौकशी जी सुरू होती, त्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. मंत्रिमंडळात कोण असावे, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री व महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र बसून घेऊ".

Comments
Add Comment

खासदारकीसाठी संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील - नवनाथ बन

- औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भाजपावर टीका करण्याचा अधिकार

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली

मुंबई: ज्यांच्या व्यासंग आणि संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमुल्य असा ठेवा उपलब्ध

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मोठा दिलासा; हेक्टरी २२ हजार रुपयांपर्यंत मदत देण्याचा राज्य सरकारचा मानस

मुंबई: गेल्या काही दिवसांत झालेल्या अवेळी पाऊस आणि हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान

राज्यातील ८९ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी रुपयांचे वितरण

शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण मुंबई : नमो

अजित पवार विमान अपघात प्रकरण: घातपाताचा संशय आढळल्यास दोषींची गय करणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीसाठी केंद्राकडे मागणी केली; एएआयबीचा अंतरिम अहवाल प्राप्त मुंबई : उपमुख्यमंत्री