डोनाल्ड ट्रम्प यांचे इस्राायलला लष्करी कारवाई तीव्र करण्याचे आवाहन
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या मध्यस्थीने सुरू असलेली युद्धविराम चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला गाझामधील लष्करी कारवाई अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले आहे. हमासला वाटाघाटींमध्ये कोणताही रस नाही, त्यांना मरायचे आहे. त्यामुळे इस्रायलने आता हे प्रकरण साफ करून काम तडीस न्यावे, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे मध्य-पूर्वेतील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेने शांतता चर्चेतून माघार घेतल्यानंतर व गाझामध्ये संघर्ष पेटलेला असताना ट्रम्प यांचे हे विधान आले आहे.
ट्रम्प यांनी हमासच्या ताब्यात असलेल्या शेवटच्या अमेरिकन-इस्रायली नागरिकाच्या, एडन अलेक्झांडरच्या सुटकेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच मुद्द्यावर बोट ठेवत ते म्हणाले, शेवटचे काही ओलीस शिल्लक आहेत व हमासला माहीत आहे की, यांची सुटका झाल्यावर काय होईल. त्यामुळेच त्यांना करार करायचा नाही.