'आयएनएस पनवेल' युद्धनौकेच्या शौर्याचे स्मारक !

शिंदे गटाच्या प्रथमेश सोमण यांचा पुढाकार


पनवेल  : १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात शौर्य गाजवणाऱ्या आयएनएस पनवेल या युद्धनौकेचे पनवेलमध्ये स्मारक उभारले जाणार आहे. याबाबत काल एक महत्त्वपूर्ण बैठक होऊन शिवसेनेचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी या विषयात पुढाकार घेऊन महापालिकेकडे तशी आग्रही मागणी शिवसेनेच्या माध्यमातून केली आहे. देशातील ऐतिहासिक शहरे, शिवाजी महाराजांच्या काळातील बंदरे असणाऱ्या शहरांचे नाव युद्धनौकेला देण्याच्या प्रथेतून भारतीय नौदलाने एका युद्धनौकेला आयएनएस पनवेल असे नाव दिले.


या युद्धनौकेने १९७१ च्या युद्धात तत्कालीन ईस्ट पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशात जाऊन प्रचंड शौर्य गाजवले व या युद्धनौकेवरील युद्धांना तीन महावीर चक्र, सात वीर चक्र, पाच नौसेना मेडल्समिळाली आहेत.


देशातील युद्धांच्या इतिहासात एवढे पराक्रमी शौर्य गाजवणारी युद्धनौका आयएनएस पनवेल ही या शहराच्या नावावरून ओळखण्यात येत होती परंतु पनवेलकरांना ही गोष्ट माहीत नव्हती. जेष्ठराज गणपती देवस्थानच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आलेल्या एका बड्या नौदल अधिकाऱ्याने ही गोष्ट सांगितली. या देवस्थानचे विश्वस्त असलेले पनवेलचे शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी याबाबत काहीतरी करावे यासाठी थोडा आणखी अभ्यास करून या विषयाबाबत आवश्यक ती माहिती देण्याकरता एका बैठकीचे आयोजन केले.


थेट नवी दिल्लीहून रिटायर्ड कर्नल अनुराग अवस्थी, डिफेन्स एक्स्पर्ट संदीप उन्निथन आणि पनवेलमधीलच स्थायिक असलेले नौदलाचे माजी कप्तान अमृत गोडबोले यांच्यासह प्रथमेश सोमण यांनी पनवेल महापालिकेत जाऊन आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. त्यांना आयएनएस पनवेलच्या शौर्य बद्दल माहिती दिल्यावर ही पनवेलकरांसाठी अतिशय गौरवाची बाब असून जास्तीत जास्त लोकांना याची माहिती व्हावी व या शौर्याचे यथोचित स्मारक पनवेल मध्ये उभे करावे याबाबत एक मत झाले. यावेळी उपस्थित सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी