Jitin Prasada: भारतातील मोबाइल फोनची निर्यात १२७% वाढली

  61

मंत्री जितीन प्रसाद यांचे संसदेत प्रतिपादन !


प्रतिनिधी: भारतातून केवळ मोबाईल फोनची निर्यात २०१४-१५ मध्ये १५०० कोटी रुपयांवरून २०२४-२५ मध्ये २ लाख कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच १२७ पट वाढली असल्याचे मंत्री जितिन प्रसादा यांनी संसदेत सांगितले आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पाद नासाठी पीएलआय (Production Linked Incentive PLI) योजनेद्वारे, प्रामुख्याने मोबाईल फोन उत्पादनासाठी जून २०२५ पर्यंत १.३ लाख थेट नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, अशी माहिती शुक्रवारी संसदेत सरकारतर्फे देण्यात आली आहे. विरोधकांनी विचार लेल्या प्रश्नाला इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री जितिन प्रसादा यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, या योजनेने १२३९० कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक आकर्षित केली आहे आणि ८.४४ लाख कोटी रुपयांचे एकत्रित उत्पादन साध्य केले आहे ' असे म्हटले.'भारताने स्वतःला निव्वळ आयातदार ते निव्वळ मोबाइल फोन निर्यातदार बनवले आहे. भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाइल उत्पादक देश आहे. पीएलआय योजनेमुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूक, उत्पादन, निर्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे,' असेही प्रसादा यावेळी म्हणाले आहेत.


त्यांनी यापुढे सांगितले की या योजनेअंतर्गत देशाने ४.६५ लाख कोटी रुपयांच्या वस्तू निर्यात केल्या आहेत .प्रसाद यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 'LSEM (Large Scale Electronic Manufacturing) योजनेसाठीच्या पीएलआय योजनेने आधीच १२३९ ० कोटींची एकत्रित गुंतवणूक आकर्षित केली आहे, ज्यामुळे ८४४७५२ कोटींचे एकत्रित उत्पादन झाले आहे, तर ४,६५,८०९ कोटींची निर्यात झाली आहे आणि जून २०२५ पर्यंत १३०३३० (प्रत्यक्ष नोकऱ्या) अतिरिक्त रोजगार निर्माण झाले आहेत,' असे मंत्री म्हणाले उत्तर देताना म्हणाले आहेत.यापुढे निवेदनात प्रसादा म्हणाले की,'आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजना २.० ने ७१७.१३ कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक आकर्षित केली आहे, ज्यामुळे जूनपर्यंत १२१९५.८४ कोटी रुपयांचे एकत्रित उत्पादन झाले आहे आणि ५ ०५६ (प्रत्यक्ष नोकऱ्या) अतिरिक्त रोजगार निर्माण झाले आहेत.  'गेल्या ५ वर्षांत (म्हणजेच आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून) इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात एकूण ४०७१ दशलक्ष डॉलर्सची थेट गुंतवणूक झाली आहे, ज्यामध्ये २८०२ दशलक्ष डॉलर्सची एकत्रित थेट गुंतवणूक मेइटीवाय पीएलआय लाभार्थ्यांनी केली आहे,' असे मंत्री म्ह णाले.

Comments
Add Comment

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी