मोहित सोमण: सलग तिसऱ्यांदा सोन्याच्या मोठी घसरण झाली आहे. बाजारातील सोन्याच्या किंमतीत जागतिक दबावाचा फटका आजही कायम असून सोन्यात घसरण सुरूच आहे.रिपोर्टप्रमाणे सतत तीन दिवस घसरणीचा परिणाम म्हणून सोने गेल्या दोन दिव सातच १८००० रूपयांहून अधिक दराने घसरले. आज 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात तब्बल ५५ रूपयांनी घसरण झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५० रूपयांनी व १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरा त ४१ रूपयांनी घसरण झाली आहे.त्यामुळे सोन्याचे प्रति ग्रॅम दर भारतीय बाजारपेठेत २४ कॅरेटसाठी ९९९३ रूपये, २२ कॅरेटसाठी ९१६० रूपये, १८ कॅरेटसाठी ७४९५ रूपयांवर पोहोचले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसारच, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५५० रूपये घसरण झाल्याने दर ९९९३० रूपयांवर, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५०० रूपयांनी घसरण झाल्याने दर ९१६०० रूपयांवर,१८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४१० रुपयांनी घसरण झाल्याने दर ७४९५० रूपयांवर पोहोचले आहेत.भारतातील मुंबई पुण्यासह प्रमुख शहरातील सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ९९९३ रूपये, २२ कॅरेटसाठी ९१६० रूपये,१८ कॅरेटसाठी ७४९५ रूपयांवर पोहोचले आहेत. तज्ञांच्या मते, सोने एक महिन्याच्या नव्या उच्चांकावर पोहोचले होते. यात आता घसरण झाली आहे. युएस गोल्ड बाजारातील चढउताराचा जागतिक पातळीवर फटका बसला.
युएसमधील अस्थिरतेचा प्रतिसाद संमिश्र असल्याने तसेच डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने सोन्यात मात्र दबाव निर्माण झाला. मागणीच्या तुलनेत पुरवठाही अधिक अ सल्याचा परिणामही कमोडिटीवर झाला.भारतीय बाजारपेठेत काल रूपया १२ पैशाहून अधिक दराने घसरल्याने सोन्याच्या दराला भारतातही आधार मिळू शकला नाही. ज्याची पुनरावृत्ती आजही होत फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल हे पुन्हा पदावर टिकून राहणार अ सल्याने युएस बाजाराने काल पुन्हा एकदा संतुलित कामगिरी केली होती. भारतात मात्र शेअर बा जारातील सातत्याने होत असलेल्या नुकसानीसाठी गुंतवणूकदारांनी सोन्याच्या पर्याय निवडला आहे ज्यांच्यामुळे सोने गेल्या आठवड्यात मोठ्या संख्येने वाढले. मात्र चढ्या दराच्या पार्श्वभूमीवर घटलेल्या मागणी मुळे आजही घसरण कायम राहिली.आज जागतिक पातळीवर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात (Gold Futures Index) यामध्ये कालच्या १% ते १.५०% घसरण आजही कायम राहिल्याने सोन्याचा निर्देशांक आज दुपारपर्यंत १.१२% कोसळला आहे. दुसरीकडे भारतातील एमसीएक्स (Multi Commodity E xchange MCX) यामध्ये आज ०.९३% घसरण झाल्याने सोन्याची दरपातळी ९७८०५ रूपयांवर गेली.
याशिवाय सोन्याच्या युएस गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत ०.९२% घसरण झाल्याने सोन्याची प्रति डॉलर दरपातळी ३३३७.१८ कोटींवर गेली. शुक्रवारी अमेरिकेतील स्पॉट गोल्ड (कॉमेक्स) १.१२% ने घसरून ३,३९२.५० प्रति औंसवर आला. युरोपियन युनियन आणि अमेरिका आता संभाव्य व्यापार कराराकडे दिशा पुढे जात असल्याचे प्राथमिक संकेत बाजारात मिळाले होते, ज्यामुळे अमेरिकेत आयात होणाऱ्या युरोपियन युनियन वस्तूंवर आता १५% वर रेसिप्रोकल टेरिफ आकारला जाण्याची शक्यता आहे याआधी भारत युके करार झाला फिलिपाईन्स व युएस त्यानंतर युएस जपान करार झाल्याने काही प्रमाणात जागतिक व्यापार तणाव कमी होण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार सोने खरेदी करताना सावधगिरी बाळगू शकतात.
सोन्याला दिलासा देत अमेरिकन डॉलर निर्देशांक एका महिन्यातील सर्वात वाईट आठवड्याकडे वाटचाल करत होता, एक महिन्याच्या उच्चांकावर सोने पोहोचल्यावर आता सोने वैश्विक कारणांमुळे स्वस्त झाले आहेच मात्र आजची दरपातळी गेल्या महिन्यापासून सर्वात कमी पातळीवर घसरलेली आहे. पुन्हा ज्यामुळे इतर चलन धारकांसाठी डॉलर प्रमाणित अर्थव्यवस्था असलेल्या देशात असलेले सोने स्वस्त झाले. आकडेवारीवरून असे दिसून आले की गेल्या आठवड्यात अमेरिकेतील बेरोजगारी दाव्यांची अनपेक्षितपणे घसरल्यानेही सोन्यात स्वस्ताई दिसून आली. फेडरल रिझर्व्हने २९-३० जुलैच्या बैठकीत दर अपरिवर्तित ठेवण्याची अपेक्षा आहे, परंतु सप्टेंबरमध्ये संभाव्य दर कपातीत बाजारपेठा किंमत कायम ठेवतील. सतत बदलणाऱ्या बाजार परिस्थितीमुळे, गुंतवणूकदार आणि व्यापारी चढउतारांवर बारकाईने लक्ष ठेवतात.