मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी आपल्या उपनगरी विभागांवर विविध अभियांत्रिकी व आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर ११.०० ते १६.०० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे, तर मुलुंड स्थानक येथून १०.४३ ते १५.५३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या /अर्धजलद ट्रेन, मुलुंड ते कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिरा पोहोचतील.


कल्याण येथून १०.३६ ते १५.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या/अर्ध जलद ट्रेन, कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन्स डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ११.०० ते १७.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या व तेथे येणाऱ्या सर्व अप व डाऊन धीम्या लोकल सेवा सुमारे १० मिनिटे उशिराने पोहोचतील/प्रस्थान करतील.


तसेच पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत आणि पनवेल येथे सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ५.०५ पर्यंत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन ब्लॉक राहील. पनवेल येथून १०.३३ ते १७.०७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०९.४५ ते १५.४४ पर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येतील.


पनवेल येथून ११.०२ ते १६.२६ पर्यंत ठाणेकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून १०.०१ ते १६.२४ पर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील ट्रेन रद्द राहतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाशी विभागात विशेष लोकल सेवा
चालवल्या जातील.

Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर