Asia Cup 2025: 'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान सामना, स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Asia Cup 2025: आशिया कप २०२५च्या तारखा समोर आल्या आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी तारखांबाबत माहिती दिली आहे. अनेक वाद आणि चर्चांनंतर भारत आणि पाकिस्तान लवकरच क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील हा सामना २०२५ च्या आशिया कपमध्ये होणार आहे, ज्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.


आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळवली जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा टी२० स्वरूपात खेळवली जाईल, जी आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ च्या तयारीचा भाग म्हणून निश्चित करण्यात आली आहे.



भारत-पाकिस्तान एकाच गटात


४ संघांना वेगवेगळ्या गटात स्थान देण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान हे संघ आहेत. गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आहेत.



भारताचा पहिला सामना या संघासोबत


आशिया कप २०२५ ही स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होईल. पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होईल. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध असेल. भारताचा दुसरा सामना १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध आहे. तर तिसरा सामना १९ सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध असेल.



८ संघ सहभागी


आशिया कपच्या आगामी आवृत्तीत आठ संघ सहभागी होतील. त्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. स्पर्धेत आठ संघांना प्रत्येकी चार अशा दोन गटात विभागण्यात आले आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि हाँगकाँग आहेत. अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि ओमान यांना गट ब मध्ये स्थान मिळाले आहे.



राजकीय तणावामुळे भारत-बांगलादेश मालिका पुढे ढकलण्यात आली


अलीकडेच, भारत आणि बांगलादेशमधील राजनैतिक तणावाचे कारण देत बीसीसीआयने ढाका येथे झालेल्या एसीसी बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने भाग घेतला. या तणावामुळे, ऑगस्ट २०२५ मध्ये प्रस्तावित भारत-बांगलादेश द्विपक्षीय मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

Comments
Add Comment

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या

वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास

बेनोनी : दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील

युवा भारताचा द. आफ्रिकेवर विजय

बेनोनी : पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा वापर करून लावण्यात आलेल्या निकालात, भारतीय १९

केकेआरच्या ताफ्यातून मुस्तफिझूर रहमानची एक्झिट

मुंबई : भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम इंडियन प्रीमियर लीग २०२६ वर झाला आहे.

न्यूझीलंड विरूद्धच्या वन डे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने न्यूझीलंड विरूद्धच्या वन डे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत आणि

Hardik Pandya Century : पांड्या इज बॅक! ६ चेंडूत ३४ धावा अन् करिअरमधील पहिलं वादळी शतक; पाहा धडाकेबाज शतकाचा Video

राजकोट : भारतीय क्रिकेट संघ आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी सज्ज होत आहे. या मालिकेसाठी संघ