ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांना 'नटवर्य केशवराव दाते पुरस्कार' जाहीर

  47

मुंबई: रंगभूमीवर महत्त्वाचे योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्याच्या उद्देशाने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कलामंडळ शाखेतर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे. 'अष्टविनायक' या नाट्यनिर्मिती संस्थेचे सर्वेसर्वा असलेल्या जाधव यांच्या नाट्य क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


गेली अनेक दशके रंगभूमीलाच आपली कर्मभूमी मानत जाधव यांनी सातत्याने तिची सेवा केली आहे. त्यांच्या या अतुलनीय योगदानाला सलाम करण्यासाठी शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता शारदा मंगल सभागृहात एका विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. ज्येष्ठ साहित्यिका आणि संस्थेच्या वार्षिकोत्सवाच्या अध्यक्षा मोनिका गजेंद्रगडकर यांच्या हस्ते जाधव यांना सन्मानित करण्यात येणार आहे.


या पुरस्काराबद्दल बोलताना दिलीप जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त केली. "गेली ५३ वर्ष रंगभूमीची अविरत सेवा सुरू आहे. आतापर्यंत अनेक नाटकांना महाराष्ट्र शासन, झी गौरव, म.टा. सन्मान, आर्यन सन्मान असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या केशवराव दाते पुरस्काराचेही (नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत) विशेष महत्त्व आहे," असे ते म्हणाले.जाधव पुढे म्हणाले, "माझ्यासाठी हा अत्यंत आनंददायी क्षण आहे. गेल्या ५३ वर्षांत मला ज्यांच्याकडून या रंगभूमीबद्दल थोडे शिकता आले, अशा नाट्य निर्मिती संस्था, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, पडद्यामागील मंडळी, असंख्य मित्र व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, त्यांची निवड समिती या सगळ्यांचा मी ऋणी आहे.


आजवरच्या माझ्या कामाची दखल घेत हा महत्त्वाचा पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे. यापुढेही माझ्याकडून रंगभूमीची सेवा अविरत होत राहील हेच वचन देऊ शकतो." त्यांच्या या शब्दांत रंगभूमीवरील निस्सीम प्रेमाचे आणि सेवेचे प्रतिबिंब उमटले.

Comments
Add Comment

संगीत नाटकासाठी रवींद्र नाट्य मंदिर २५% सवलतीत

सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा मुंबई: संगीत नाटकासाठी २५% सवलतीच्या दरात रवींद्र नाट्यगृह

नाट्य परिषदेच्या 'नाट्य परिषद करंडक' खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची घोषणा

मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबईने 'नाट्य परिषद करंडक' या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका

"आज्जी बाई जोरात" आता शाळांमध्येही: मराठीची गोडी वाढवण्यासाठी अनोखा उपक्रम!

मुंबई: जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित, क्षितीज पटवर्धन लिखित व दिग्दर्शित 'म मराठीचा' म्हणत मराठी रंगभूमीवर धमाल

‘तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र…

मुंबई : नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य आणि चित्रपट निर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांना रिझवणारे

अन् अभिनेत्री नीना कुलकर्णी रंगमंचावरच कोसळल्या

मुंबई (प्रतिनिधी): ज्येष्ठ मराठी अभिनेत्री नीना कुलकर्णी सध्या ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकात महत्त्वाचे पात्र

प्रशांत दामले यांचा नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : नवीन कार्यकारिणी नियुक्त झाल्यापासून झपाट्याने कामे पूर्ण करण्याचा धडाका लावणारे अखिल भारतीय मराठी