मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घराच्या विविध दिशांचे आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतात. अनेकदा हे परिणाम सकारात्मक असतात तर काही परिणाम नकारात्मक असतात. वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला घड्याळ लावणे अतिशय शुभ मानले जाते. कारण घड्याळ हे वेळेचे प्रतीक मानले जाते.
हे घड्याळ योग्य ठिकाणी लावल्याने उर्जेचे संतुलन राखण्यासाठी गरजेचे असते. घरात घड्याळ लावण्यासाठी सगळ्यात योग्य दिशा हा उत्तर अथवा पूर्व मानली जाते. उत्तर दिशेला धन आणि समृद्धीचे कारक सांगितले आहे. तर पूर्व दिशा सकारात्मक उर्जेचा स्त्रोत असते.
जेव्हा घड्याळ तुम्ही उत्तर अथवा पूर्व दिशेला भिंतीवर लावतात तेव्हा घरात चांगल्या उर्जेचा संचार वाढतो. तसेच वेळेला अधिक महत्त्व प्राप्त होते. वास्तुशास्त्रात पश्चिम आणि दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये पश्चिम दिशेला घड्याळ लावल्याने वेळेची गती मंदावू शकते. यामुळे कुटुंबात अनावश्यक तणाव आणि त्रास होऊ शकतो.
याशिवाय घड्याळ नेहमी स्वच्छ आणि योग्य वेळ दाखवणारे असावे. तुटलेले-फुटलेले अथवा योग्य वेळ न दाखवणारे घड्याळ नेहमी नकारात्मक उर्जेचे प्रतीक ठरू शकते. घड्याळ हे नेहमी भिंतीवर नजरेच्या समोर अथवा थोड्या उंचीवर लावले पाहिजे.