'अवकारीका' चित्रपटातून रोहित पवारचं पदार्पण: स्वच्छतादूताच्या भूमिकेतून देणार सामाजिक संदेश

  63

मुंबई : मॉडेल आणि फॅशन कोरिओग्राफर रोहित पवार आता मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'अवकारीका' या मराठी चित्रपटात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रोहित अभिनेता विराट मडकेसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. रेडबड मोशन पिक्चर या बॅनरखाली निर्मित आणि अरविंद भोसले दिग्दर्शित 'अवकारीका' हा चित्रपट सामाजिक संदेश देणारा आहे.



चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर आणि अरुण जाधव यांनी केली असून, मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, आणि गीता सिंग यांची सहनिर्मिती आहे. आपल्या पदार्पणाबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाला, "रेडबड मोशन पिक्चरसोबत माझं खूप वर्षांपासूनचं नातं आहे. माझ्या खडतर प्रवासात त्यांनी मला खूप आधार दिला. आर्थिक अडचणी आणि अपमान सहन करत असतानाही माझं ध्येय मात्र अढळ राहिलं. 'अवकारीका' हा माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नाही, तर माझं स्वप्न आहे. माणूस म्हणून मी समाजासाठी काय देऊ शकतो, हा विचार मला 'अवकारीका'ने दिला."


या चित्रपटात रोहित एका चेंबर साफ करणाऱ्या स्वच्छतादूताची भूमिका साकारत आहे. या भूमिकेबद्दल तो म्हणाला, "शूटिंगदरम्यान मी या कामगारांना जवळून पाहिलं. त्यांच्या डोळ्यातील हतबलता, वेदना, आणि तरीही कामाप्रती असलेली निष्ठा पाहून मी हेलावून गेलो. हा चित्रपट करताना माझ्या डोळ्यात अनेकदा पाणी आलं. हा केवळ अभिनय नव्हता, तर त्यांच्या वेदनेचा, संघर्षाचा, आत्मसन्मानाचा एक अंश माझ्यात अनुभवण्याचा प्रवास होता."


'अवकारीका'ची कथा-पटकथा, संवाद आणि गीते अरविंद भोसले यांनी लिहिली आहेत. कैलाश खेर, सुनिधी चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या सुमधुर आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. स्वच्छता कामगारांची व्यथा संवेदनशीलपणे मांडत, समाजाला आरसा दाखवणारा 'अवकारीका' हा चित्रपट येत्या १ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Comments
Add Comment

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा