अभिमानास्पद बातमी: महाराष्ट्र अर्थव्यवस्थेत नंबर १, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर एवढी, २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होणार !

  96

जगविख्यात संस्था मॉर्गन स्टॅनलीचा नव्या अहवालात महाराष्ट्राची कौतुकास्पद कामगिरी अधोरेखित

प्रतिनिधी:देशातील सगळ्या मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे नव्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. '२०३० पर्यंत महाराष्ट्राचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) १ ट्रिलियन डॉलरवर पोहोचेल' असे नामांकि त कंपनी मॉर्गन स्टॅनलीने आपल्या अहवालात म्हटले. प्रामुख्याने ही वाढ ' प्रगतीशील नेतृत्व, मजबूत धोरणे, प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आर्थिक पायाभूत सुविधा (Massive Infrastructure), सामाजिक प्रकल्पातून विकास' या कारणांमुळे झाली असल्याचे अहवा लात स्पष्टपणे नमूद केले गेले आहे. महाराष्ट्र द लिडिंग वे' (Maharashtra leading the way) या मथळ्याखाली हा अहवाल मॉर्गन स्टॅनलीने छापला. यातील मजकुरात म्हटल्याप्रमाणे,'सध्या महाराष्ट्राचा जीडीपी ५३६ अब्ज डॉलरवर आहे. एकूणच भारताच्या अ र्थव्यवस्थेतील जीडीपीची १३.७% आर्थिक उलाढाल केवळ महाराष्ट्रातून होते जी सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेऐवढी आहे.' असे निरीक्षणही अहवालात कंपनीकडून नोंदवण्यात आले.

'महाराष्ट्र जगातील २८ वी अर्थव्यवस्था झाली आहे. विशेषतः अनेक आर्थिक पातळीवर ही वाढ नोंदविण्यात आल्याने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. प्रामुख्याने कुशल नेतृत्व, सामाजिक योजना, मूलभूत सुविधा, रस्ते, धोरणात्मक निर्णय अशा अनेक पातळ्यांवर झाले असे अहवालात म्हटले आहे. याखेरीज महत्वाचे निरिक्षण म्हणजे, 'महाराष्ट्राचा जीडीपी देशाच्या एकूण प्रति दरडोई उत्पन्न (Per capita income) तुलनेत १.६ वेळा आहे. ज्यातून महाराष्ट्राची आर्थिक प्रगल्भता दिसून येते असे कंपनीने आपल्या निवेदनात म्ह टले आहे.

याविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अहवाल आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत कंपनीचे आभार मानत ते म्हणाले, 'भारतात व जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रतिष्ठित गुंतवणूक बँकिंग, संशोधन आणि वित्तीय संस्था मॉर्गन स्टॅनलीने नु कताच आपला नवीनतम अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये महाराष्ट्राला जवळजवळ सर्व प्रमुख आर्थिक घटकांमध्ये आघाडी मिळाली आहे. आपल्या राज्याचे आणि त्याच्या कौशल्याचे हे अत्यंत विश्वासार्ह रँकिंग आमच्या धोरण आणि प्रगतीचे प्रतीक आहे.आप ल्या राज्यावर आणि आमच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याबद्दल मॉर्गन स्टॅनलीचे आभार. आर्थिक विकासापासून पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण, निर्यात, राजकोषीय विवेक, धोरणात्मक सुधारणा ते ऊर्जा संक्रमण आणि बरेच काही ...जगातील २८ वी सर्वात मो ठी अर्थव्यवस्था, #महाराष्ट्र २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठणार आहे!'

महाराष्ट्राच्या गौरवशाली प्रवासाची अंतर्दृष्टी दर्शविणारा मॉर्गन स्टॅनलीचा शोधनिबंध येथे आहे! मॉर्गन स्टॅनलीच्या एकूण स्कोअरकार्डमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे म्हटले. सध्या महाराष्ट्राचे २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न आहे. त्यात महाराष्ट्राने आणखी एक पाऊल टाकून आगेकूच केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.' महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेतील झालेली वाढ प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील वाढणारी पायाभूत सुविधा, वाढलेली उत्पादनक्षमता, वाढलेले सेवा क्षेत्र, विविध उद्योगांची पायाभरणी या कारणांमुळे झाली असे अहवालात म्हटले गेले.

या अहवालात महाराष्ट्राची मजबूत आर्थिक स्थिती अधोरेखित करण्यात आली आहे. आणखी एक ठळक बाब म्हणजे,' कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर १८.५ टक्के आहे, जे भारतीय राज्यांपैकी सर्वात कमी आहे. महामारीच्या काळातही त्यांनी वित्तीय तूट जीडीपीच्या ३ टक्क्यांपेक्षा कमी राखली आहे' असे म्हटले गेले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक,नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वाढवन बंदर यासारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल आणि अधिक गुंतवणूक आकर्षित होईल अशीही अपेक्षा अहवालात व्यक्त केली गेली.

सामाजिक बाबतीत अहवालात म्हटले,'राज्य साक्षरता, लिंग समानता आणि आरोग्यसेवा यासारख्या सामाजिक निर्देशकांमध्येही आघाडीवर आहे, जरी मॉर्गन स्टॅनली यांनी निदर्शनास आणून दिले की शेती उत्पन्न वाढवणे आणि हवामान-लवचिक शहरी विकास सु निश्चित करण्यात आव्हाने कायम आहेत.'उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शाश्वत शेती सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक तंत्रे आणि पद्धतींचा अवलंब करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे असे त्यात म्हटले आहे, ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये एकत्रित करण्या च्या उद्देशाने महाकृषी-एआय धोरण २०२५-२०२९ सारख्या उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे असे पुढे अहवालात अधोरेखित केले गेले. मात्र अहवालात असाही इशारा दिला गेला आहे की महाराष्ट्राने लक्षणीय प्रगती केली असली तरी त्याचे नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी त्याला उत्पादन वाढ आणि उत्पन्नातील असमानता दूर करावी लागेल.
Comments
Add Comment

डुकरांच्या रक्षणासाठी कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार

प्रशांत कोठावदे । सटाणा : तालुक्यातील अंबासन येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गावातील एका डुक्कर

युक्रेनच्या माजी संसद सभापतींची गोळ्या घालून हत्या

ल्विव्ह: पश्चिम युक्रेनमध्ये एका प्रमुख युक्रेनियन राजकारणी आणि माजी संसद सभापतींची अज्ञात हल्लेखोरांकडून

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील धक्कादायक व्हिडीओ, तरुणाला भोवली अतिघाई

रत्नागिरी : चालत्या गाडीत चढू नये किंवा चालत्या गाडीतून उतरू नये असे आवाहन रेल्वे प्रशासन वारंवार करते. पण

जरांगेंच्या आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही मिळाली परवानगी!

मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत लाखोंचा जनसमुदाय घेऊन आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बेमुदत

मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग