मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील आघाडीच्या बँकांपैकी एक पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपल्या ग्राहकांना ०८.०८.२०२५ पर्यंत 'आपल्या ग्राहकांना जाणून घ्या'(Know Your Cu stomer KYC केवायसी) माहिती अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून त्यांच्या खात्यांचे कामकाज सुरळीत चालेल. हे फक्त त्या ग्राहकांसाठी लागू आहे ज्यांचे खाते ३०.०६.२०२५ पर्यंत केवायसी अपडेट झालेले नाही.
केवायसी अनुपालन सराव (KYC Compliance Exercise) संबंधित एक भाग म्हणून, पीएनबी ग्राहकांना त्यांचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, नवीनतम छायाचित्र, पॅन/फॉर्म ६०, उत्पन्नाचा पुरावा, मोबाईल क्रमांक (जर उपलब्ध नसेल तर) यासारखे अपडेट केलेले तपशील सादर करण्याची विनंती केली जाते. किंवा कोणत्याही शाखेला इतर कोणतेही केवायसी तपशील द्या असे बँकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. हे पीएनबी वन, इंटरनेट बँकिंग सर्व्हिसेस (Internet Banking Service IBS) किंवा त्यांच्या मूळ शाखेत नोंदणीकृत ईमेल/पोस्टद्वारे ०८.०८.२०२५ पर्यंत देखील करता येते. निर्धारित वेळेत केवायसी तपशील अपडेट न केल्यास खात्याच्या कामकाजावर निर्बंध येऊ शकतात.
कोणती कागदपत्रे सादर करावी ?
केवायसी अपडेटसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतील -
ओळखीचा पुरावा (जसे की आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र)
अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
पत्त्याचा पुरावा
उत्पन्नाचा पुरावा (लागू असल्यास)
पॅन कार्ड किंवा फॉर्म ६०
मोबाइल नंबर (नोंदणीकृत नसल्यास)
इतर कोणतेही आवश्यक कागदपत्रे
कोणत्याही मदतीसाठी, ग्राहक त्यांच्या जवळच्या पीएनबी शाखेला भेट देऊ शकतात किंवा अधिकृत वेबसाइट https://www.pnbindia.in/ ला भेट देऊ शकतात.
खबरदारी: कृपया तुमचे केवायसी अपडेट करण्यासाठी कोणत्याही असत्यापित स्त्रोताकडून मिळालेल्या कोणत्याही लिंक/फाइलवर क्लिक/डाउनलोड करू नका, असे आवाहन बँकांच्या वतीने करण्यात आले आहे.