नवी मुंबई महापालिका हद्दीत पहिल्या ‘क्लस्टर’ प्रकल्पांना परवानगी

वाशीतील दोन प्रकल्पांसाठी महापालिकेचा हिरवा कंदील


नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका हद्दीत पहिल्या ‘क्लस्टर’ प्रकल्पांना परवानगी देण्याची प्रक्रिया महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. नवी मुंबईतील सिडकोने उभारलेल्या जेएन-१-२ प्रकारच्या चार वसाहतींमधील रहिवाशांनी एकत्र येत समूह विकास योजनेच्या मंजुरीसाठी आग्रह धरला होता. वाशीतील दोन नागरी पुनरुत्थान नकाशांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेस गती मिळाली असून राज्य सरकारने मंजुरी दिल्यास हे दोन्ही प्रकल्प शहरातील पहिले ‘क्लस्टर’ प्रकल्प म्हणून ओळखले जातील.


नवी मुंबईतील सिडकोने उभारलेल्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर परवानग्या दिल्या जात आहेत. एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार (युडीसीपीआर) नागरी पुनरुत्थान योजनेसाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत.


नवी मुंबईतील जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या तसेच बेकायदा ठरलेल्या इमारतींनाही यामुळे समूह विकास योजनेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिडकोच्या आणि ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात लगतच्या रस्त्यांच्या आकारानुसार प्रकल्पांना किती प्रमाणात वाढीव चटईक्षेत्र दिले जाईल हे ठरते.
वाशी, कोपरखैरणे, नेरुळमध्ये महत्वाच्या जागेवर आणि रुंद रस्त्यांलगत असलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुबलक चटईक्षेत्र मिळत असल्याने बहुसंख्य वसाहतींनी पुनर्विकास करण्याची भूमिका घेतली आहे. वाशी सेक्टर नऊ परिसरातील जे.


एन १-२ प्रकारात मोडणाऱ्या वसाहतींमधील रहिवाशांनी एकत्र येत यासंबंधीचा प्रस्ताव विकासकामार्फत महापालिकेस सादर केला होता. प्रस्तावातील नकाशे महापालिकेने जाहीर केले आहेत. ‘क्लस्टर’मार्फत मंजुरीसाठी हरकती, सूचना मागविल्या आहेत.

Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

Navi Mumbai Traffic : पाम बीच रोडवर 15 आणि 16 ऑगस्टला वाहतूक निर्बंध; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील

Navi Mumbai Railway : ऐरोली ते बेलापूर रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट; प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

नवी मुंबई : ऐरोली ते बेलापूरदरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. या स्थानकांमधील

Devendra Fadnavis : भारताच्या भविष्यातील विकासाचे मुख्य केंद्र नवी मुंबईच; "मेघालय भवन" विकास संस्कृती आणि एकात्मतेचा संगम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'मेघालय भवन' उभारणीसाठी जमीन हस्तांतरण व भूमीपूजन सोहळा

Koparkhairane Connecting Link : नवी मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! कोपरखैरणेतील 'कनेक्टिंग लिंक' पुलाचे गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

नवी मुंबई : नवी मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या कोपरखैरणे आणि परिसरातील नागरिकांना आता वाहतूककोंडीच्या त्रासातून

Airoli Murder Mystery : ११ महिने पचवला मर्डर, पण 'त्या' एका चुकीने खेळ खल्लास! ऐरोलीतील थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश

नवी मुंबई : सिया आणि केतन या बहुचर्चित हत्याकांडाची चर्चा अद्याप ताजी असतानाच, नवी मुंबईतील ऐरोली (Navi Mumbai) परिसरातून