‘सबका साथ, सबका विकास’मुळे देशात प्रगती
नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न १,१४,७१० रुपये झाले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत यासंबंधी माहिती दिली. २०१४-१५ मध्ये स्थिर किमतींवर दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न ७२,८०५ रुपये होते. गेल्या दशकात ४१,९०५ रुपयांनी वाढ झाली आहे. राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आपल्या उत्तरात म्हटले की, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या जीडीपीच्या तात्पुरत्या अंदाजानुसार, २०२४-२५ साठी स्थिर किमतींवर दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न १,१४,७१० रुपये आहे. दहा वर्षांपूर्वी हेच प्रमाण ७२,८०५ रुपये एवढे होते.
भारताच्या अनेक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’ हे धोरण अवलंबले असून यामाध्यमातून सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. गरीबी कमी करण्यासाठी आणि समाजातील आर्थिक असमानता घालविण्यासाठी सरकारने विविध योजना आखल्या असल्याचीही माहिती त्यांनी दिली. या माध्यमातून देशभरातील वंचित घटकांना चांगल्या दर्जाचे जीवनमान प्रदान करण्यात सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई : मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन सूचनांमुळे राज्यातील मत्स्य प्रकल्प अधिक कार्यक्षम होतील तसेच स्थानिक उत्पादकांनाही चालना मिळेल. ...
सर्वाधिक दरडोई उत्पन्नात कर्नाटक पहिला
संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटकचा प्रथम क्रमांक लागतो. कर्नाटकचे दरडोई उत्पन्न २,०४,६०५ रुपये इतके आहे. त्याखालोखाल तमिळनाडू १,९६,३०९ रुपये, हरियाणा १,९४,२८५ रुपये, तेलंगणा १,८७,९१२ रुपये आणि पाचव्या क्रमांकावर १,७६,६७८ रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणाची प्रगती
२०१३-१४ साली महाराष्ट्र सर्वाधिक दरडोई उत्पन्नाच्या यादीत हरियाणा नंतर दुसऱ्या स्थानावर होता. त्यावेळी महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १,०९,५९७ इतके होते. तर दुसऱ्या वर्षी त्यात वाढ होऊन दरडोई उत्पन्न १,१५,०५८ रुपयांवर पोहोचले होते. २०१४-१५ साली कर्नाटकचे दरडोई उत्पन्न १,०५,६९७ रुपये, तमिळनाडूचे १,०७,११७ रुपये आणि तेलंगणाचे १,०१,४२४ रुपये इतके उत्पन्न होते. महाराष्ट्राच्या मागे असलेली ही तीनही राज्य आता पुढे गेली आहेत. महाराष्ट्राची मात्र म्हणावी तशी आर्थिक प्रगती आकडेवारीनुसार तरी झालेली दिसत नाही.
देशातील दरडोई उत्पन्नात राज्यांची क्रमवारी
कर्नाटक, तमिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश, पंजाब, ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, आसाम, मेघालय, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, झारखंड, केरळ, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगड, दिल्ली, लडाख.