मुंबई : राजस्थानमधील शाळेच्या छताखाली सात मुलांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने पावलं उचलण्यात आली आहेत. राज्यातील धोकादायक शाळांची तात्काळ तपासणी (ऑडिट) करण्याचे आदेश देण्यात आले असून, यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यमंत्री पंकज भोयर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, तात्काळ बैठक बोलावण्यात आली असून, प्रधान सचिव, आयुक्त, संचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यभरातील जी शाळा मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत, अशा शाळांवर तातडीने कारवाई आणि निधीवाटप सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई : मराठी कलाकार आणि भाषेवरून सध्या वाद पेटला आहे. अभिनेत्री केतकी चितळेच्या 'मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का?' या वक्तव्यानंतर आता मराठमोळी ...
दरम्यान, मंत्रिमंडळ फेरबदलावर करण्यात आलेल्या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना भोयर म्हणाले की, “मी सामना वाचत नाही. निर्णय वरिष्ठ नेते घेतात. काहीही होईल असं वाटत नाही. तसंच मराठी चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, जिथे अडचण आहे तिथे सरकार मदतीस तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक निर्मात्याने आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही नक्की मदत करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं.