Sneha Wagh : केतकी चितळेनंतर स्नेहा वाघ: 'मराठी मालिका आता नाही, कारण माझी भाषा बदललीये!'

मुंबई : मराठी कलाकार आणि भाषेवरून सध्या वाद पेटला आहे. अभिनेत्री केतकी चितळेच्या 'मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का?' या वक्तव्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघनेही त्यात भर घातली आहे. "मला टेलिव्हिजनवर काम करायला आवडेल, पण मराठीत नाही, कारण माझी भाषा थोडी बदलली आहे," असे वक्तव्य स्नेहाने एका मुलाखतीत केले आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.





मराठी टेलिव्हिजनमधून हिंदीत गेलेल्या अनेक कलाकारांपैकी स्नेहा वाघ हे एक नाव आहे. 'बिग बॉस मराठी सीझन ३' मध्ये दिसलेल्या स्नेहाने 'अधुरी एक कहाणी', 'या गोजिरवाण्या घरात' यांसारख्या मालिकांमधून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर तिने हिंदीतही भरपूर काम केले. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या संघर्षाच्या दिवसांपासून ते आतापर्यंतच्या प्रवासाविषयी सांगितले. "एक व्यावसायिक कलाकार म्हणून मला फारसा संघर्ष करावा लागला नाही," असे ती म्हणाली.



स्नेहाने यावेळी तिच्या भाषेतील बदलावर लक्ष वेधले. ती म्हणाली, "मी जेव्हा हिंदीमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझी भाषा ऐकून माझ्या दिग्दर्शकांनी त्यांच्याकडील छडीने मारलं होतं. 'तुझी भाषा मराठी नाही, हिंदी नाही, ही कोणती भाषा आहे?' असं विचारलं होतं." त्यावेळी दिग्दर्शकांनी तिला सांगितले की, "तू ज्या भाषेत विचार करशील ती तुझी भाषा चांगली होईल. त्यामुळे जर तुमची भाषा चांगली व्हायला हवी असेल, तर तुम्ही त्या भाषेत विचार करायला पाहिजे."


स्नेहाने पुढे सांगितले की, "त्यामुळे माझ्या भाषेत बदल झाले, आता मी वृंदावनला राहत असल्यामुळे मला ब्रजभाषा यायला लागली आहे."

Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे