Rishabh Pant : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ऋषभ पंत आऊट! फलंदाजीसाठी कोण उतरणार?

मुंबई : टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मँचेस्टर येथे सुरू असलेल्या कसोटीत टीम इंडियाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) दुखापतीमुळे बाहेर पडल्याने भारतीय संघाला खूप मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सचा एक चेंडू पंतच्या बुटावर लागला, त्यामुळे तो वेदनेने ओरडू लागला. त्यामुळे पंतला ताबडतोब मैदानाबाहेर काढण्यात आले. पंतच्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं असून त्याला ६ आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे टीम इंडियाच्या अडचणी खूप वाढल्या आहेत आणि आता त्यांना मँचेस्टर कसोटी सामन्यात फक्त ९ फलंदाजांसह मैदानात उतरावे लागेल. ऋषभ पंतला (Rishabh Pant Injury) ६ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. आता पंतच्या जागी टीम इंडियाच्या १५ सदस्यांच्या संघात इशान किशनचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.



टीम इंडियाकडून फक्त १० जण करणार फलंदाजी


ऋषभ पंतच्या जागी दुसरा कोणताही फलंदाज फलंदाजी करू शकणार नाही. ध्रुव जुरेल निश्चितपणे पंतच्या जागी विकेटकीपिंग करु शकणार, मात्र त्याला फलंदाजीसाठी परवानगी नसणार.





६ आठवड्यांसाठी पंत बाहेर?


सामन्याच्या ६८ व्या षटकात ऋषभ पंतला दुखापत झाली. ऋषभ पंतला ख्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्विप मारायचा होता, मात्र तो हा फुल टॉस बॉल पूर्णपणे चुकवल्याने चेंडू पंतच्या उजव्या बोटावर लागला. पंतने त्याचा बूट काढला तेव्हा त्याला दिसले की थोडा रक्तस्त्रावही होत आहे. काही वेळाने त्याच्या पायावर सूज देखील दिसू लागली. तो चालण्यास असमर्थ होता, त्यानंतर मैदानावर रुग्णवाहिका बोलावत पंतला रुग्णालयात हलवण्यात आले होते.



चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी काय घडले?


इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. यानंतर केएल राहुल ४६ धावांवर बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल ५८ धावांवर बाद झाला. शुभमन गिलही अपयशी ठरला. बेन स्टोक्सने १२ धावांवर शुभमन गिलला बाद केले. संघात पुन्हा परतलेल्या साई सुदर्शनने ६१ धावा केल्या. तर ऋषभ पंत रिटायर्ड हर्ट झाला. रवींद्र जडेजा १९ आणि शार्दुल ठाकूर १९ धावांवर खेळत आहे.

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

Rohit Sharma Retirement News : रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा; इंग्लंडविरुद्धचा सामना ठरणार शेवटचा?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज (Batsman) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वनडे (ODI)

IND vs ENG : कार्डिफमध्ये इंग्लंडची बाजी; भारताला पराभूत करत मालिकेत साधली बरोबरी

कार्डिफ : जो रूट (Joe Root) याच्या नाबाद ९९ धावांच्या (Runs) शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा दुसऱ्या एकदिवसीय (ODI)

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी