Motilal Oswal Q1Results: मोतीलाल ओसवालचा आर्थिक 'चौकार' सगळ्याच बाबतीत तिमाहीत चांगले प्रदर्शन PAT १४३० कोटींवर !

  57

प्रतिनिधी:मोतीलाल ओसवाल या देशांतील सर्वात मोठ्या इक्विटी रिसर्च ब्रोकिंग (Motilal Oswal Financial Services Ltd (MOFSL) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीने पहिल्या तिमाहीत (Q1FY26 )आर्थिकदृष्ट्या चांगले प्रदर्शन केले आहे.कंपनीच्या एकूण करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर वाढत १४३० कोटींवर गेले आहे. कंपनीच्या असेट मॅनेजमेंट व खाजगी वेल्थ व्यवस्थापनात झालेल्या मोठ्या वाढीमुळे हा निकाल साधला गेला असल्याचे कंपनी ने निकाल जाहीर करताना नमूद केले आहे. कंपनी समुहाच्या एकूण महसूलात (Total Revenue) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) मध्ये तब्बल ७२% वाढ झाली आहे. निकालातील माहितीनुसार, कंपनीच्या निव्वळ ऑपरेटिंग महसूल (Net Operating Revenue) मध्ये २४% वाढ झाल्याने महसूल १४१२ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या करोत्तर ऑपरेटिंग नफ्यात (Net Operating PAT) इयर ऑन इयर बेसिसवर २१% वाढ झाल्याने  या तिमाहीत झालेल्या करोत्तर नफा ५२२ कोटींच्या घरात पोहोचला आहे. कंपनीच्या एकत्रित करोत्तर नफा (Consolidated PA T) यामध्ये ४०% वाढ झाल्याने हा नफा १४३० कोटींवर गेला आहे.


कंपनीच्या वेल्थ मॅनेजमेंट व्यवसायात करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) १७४ कोटींवर पोहोचला आहे. मालमत्ता व्यवस्थापन (Asset Management) व्यवसायातील करोत्तर नफा इयर ऑन इयर बेसिसवर ४३% वाढत २२४ कोटींवर पोहोचला. तर कंप नीच्या भांडवली बाजार (Capital Market Buisness) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ६४% वाढ झाल्याने करोत्तर नफा ९४ कोटींवर पोहोचला. घरगुती वित्त व्यवसाय (Housing Finance Buisness) मध्ये करोत्तर नफ्यात वार्षिक वाढ होत २३ कोटींवर पोहो चला.


आजच्या जाहीर केलेल्या निकालावर व्यक्त होताना एमडी आणि सीईओ मोतीलाल ओसवालम्हणाले आहेत की, 'आर्थिक वर्ष २६ चा पहिला तिमाही आमच्यासाठी एक ऐतिहासिक तिमाही होता, आमच्या सर्व व्यवसायांमध्ये अपवादात्मक कामगिरीसह १४३० को टींचा आतापर्यंतचा सर्वाधिक PAT प्रदान केला. आमच्या एएमसीने १.५ लाख कोटी मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM)ओलांडला, खाजगी संपत्ती व्यवस्थापन व्यवसायाने आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल प्रदान केला, गृहनिर्माण वित्तपुरवठा ५००० कोटी AUM वाढवला आणि कॅपिटल मार्केट्सने मजबूत व्यवहार अंमलबजावणीद्वारे त्यांचा आतापर्यंतचा सर्वोत्तम तिमाही प्रदान केला.


हे निकाल भांडवली बाजारपेठांमध्ये (किरकोळ ते संस्थात्मक) समूहाच्या कौशल्याची खोली आणि भारताच्या बचतीच्या जलद वित्तीयकर णातून निर्माण होणाऱ्या प्रचंड संधीचे प्रतिबिंबित करतात. माझा ठाम विश्वास आहे की ही अनेक दशकांची विकासकथा आहे आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस दीर्घकालीन मूल्यनिर्माता म्हणून धोरणात्मक स्थितीत आहे. सखोल संशोधन, मजबूत क्लायंट संबंध आणि वैयक्तिकृत सल्लागार आणि एक मजबूत बॅलन्स शीटद्वारे समर्थित पूर्ण-स्पेक्ट्रम कॅपिटल मार्केट प्लॅट फॉर्मसह आम्ही पुढे जाण्यासाठी चांगल्या स्थितीत आहोत. आम्ही तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी, क्लायंट अनुभव वाढविण्यास आणि बा जार चक्रांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी प्रदान करण्यास तितकेच वचनबद्ध आहोत.'

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण