IMF UPI: जगात युपीआयचा डंका ! जगातील 'इतका' व्यवहार फक्त युपीआयचा, Visa पेमेंटलाही टाकले मागे !

  55

भारतातही एकट्या युपीआयचा मार्केट शेअर ८५%

प्रतिनिधी: जगभरात भारताचा डंका वाजत आले. यावेळी थेट आयएमएफने (International Monetary Fund IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) या जागतिक संस्थेने भारतीय युपीआय (Unified Payment Interface UPI) प्रणालीचे कौतुक केले. याविषयी सं स्थेने लिहिले आहे की जागतिक पातळीवर एकूण डिजिटल प्रणालीपैकी ५०% वाटा हा केवळ युपीआय व्यवहारांचा आहे. त्यामुळे भारत हा जागतिक पातळीवर डिजिटल पेमेंटमध्ये अग्रेसर देश ठरला असल्याचे आयएमएफने आपल्या अहवालात म्हटले आहे. अ हवालातील निरीक्षणानुसार,केवळ जून महिन्यात २४.०३ लाख कोटींची उलाढाल केवळ युपीआयतून झाली आहे व १८.३९ अब्ज व्यवहार हे युपीआयमधून झाले आहेत. 'Growing Retail Digital Payment The Value of Interoperability या आपल्या रिस र्च प्रबंधात IMF संस्थेने हे निरीक्षण स्पष्ट केले.

२०१६ साली एनपीसीआयने (National Payment Corporation of India NPCI) युपीआय ही स्वदेशी डिजिटल पेमेंट प्रणाली विकसित केली जी अल्पावधीतच विस्तारत आता जगभर प्रसिद्ध झाली आहे. केवळ भारताचा विचार केल्यास साधारणतः दर महि न्याला १८ अब्ज व्यवहार युपीआयमार्फत होतात. उपलब्ध माहितीनुसार मागील जूनचा विचार केल्यास यावर्षी जूनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर व्यवहारात ३२% वाढ झाली आहे.यावर्षी जून महिन्यातच १६.३९ अब्ज डिजिटल पेमेंट व्यवहार झाले जे २४.०३ लाख मुल्यांकनाचे आहेत.

४९१ दशलक्ष वापरकर्ते आणि ६५ दशलक्ष व्यापाऱ्यांसह, युपीआय (UPI) ६७५ बँकांना एकाच डिजिटल फ्रेमवर्कद्वारे जोडते. या बदलामुळे भारत रोख व्यवहार आणि कार्ड-आधारित पेमेंटपासून दूर गेला आहे हे स्पष्ट होत आहे आणि डिजिटल-प्रथम अर्थव्यव स्था (Digital First Economy) कडे ओढला गेला‌‌. लाखो व्यक्ती आणि लघु व्यवसाय आता सुरक्षित आणि कमी किमतीच्या व्यवहारांसाठी युपीआयवर अवलंबून आहेत.

अहवालातील निरीक्षणानुसार, भारतातील डिजिटल व्यवहारांपैकी ८५% वाटा केवळ युपीआयचाच आहे. भारताबाहेरही युपीआयचे ४९१ दशलक्ष वापरकर्ते (Users) आहेत व ६५ पेक्षा अधिक मर्चंट युपीआय स्विकारतात. एकाच मोबाईल क्रमांक व एकाच युपी आयडीवरून कुठेही सहजपणे व्यवहार करता येत असल्याने कार्ड पेमेंटमध्ये घट झाली आहे. यूपीआय आधीच युएई, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरिशससह सात देशांमध्ये उपलब्ध आहे. आगामी काळात अधिक देश युपीआय स्विकारतील अशी शक्यता आहे. युपीआयला जागतिक ओळख मिळत आहे त्यामुळे त्याचा स्विकार जगभर होत आहे. वापरण्यास सोपी, सरळ, टाईमलेस फिचर्समुळे ही वाढ होत आहे.

आयएमएफच्या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे की, 'यूपीआय तंत्रज्ञान भौगोलिकदृष्ट्या भारतापुरते मर्यादित राहिले नाही, जसे की अलिकडच्या काळात अनेक राष्ट्रांनी देखील स्वीकारले आहे.' यामुळेच लोक विसा मास्टरकार्डला चांगला व सोपा पर्या य म्हणून युपीआय स्विकारतात.
Comments
Add Comment

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

पिंपळी नदीवरील ५० वर्ष जुना पूल खचला, पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद

चिपळूण: सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी लोकं मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. त्यामुळे या काळांत

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी