स्कॉच आणि व्हिस्की पिणा-यांना खूशखबर! भारताचा इंग्लंडसोबत मुक्त व्यापार करार; 'या' वस्तू होणार स्वस्त!

लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी आज (गुरुवारी, २४ जुलै, २०२५) ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. अमेरिकेने भारतावर मोठे शुल्क (टॅरीफ) लादल्यानंतर भारताने ब्रिटनसोबतच्या या कराराला प्राधान्य दिले होते. या करारामुळे ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या ९० टक्के वस्तू स्वस्त होतील, तर भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या ९९ टक्के वस्तूंवरील शुल्क कमी होणार आहे.


या करारामुळे ब्रिटनमधून येणारी स्कॉच आणि व्हिस्की तर स्वस्त होईलच, पण त्याव्यतिरिक्त विविध कार, ब्रँडेड मेकअप उत्पादने आणि काही खाद्यपदार्थही स्वस्त होणार आहेत. दुसरीकडे, भारतीय उत्पादनांवरील किंमती कमी झाल्याने ब्रिटनमध्ये त्यांची मागणी प्रचंड वाढेल असा अंदाज आहे. यात कापड, मौल्यवान वस्तू, इंजिनिअरिंगपासून ते ऑटो सेक्टरपर्यंतच्या असंख्य गोष्टींचा समावेश आहे.


स्कॉच आणि व्हिस्की स्वस्त होणार: ब्रिटनच्या स्कॉच व्हिस्कीवर सध्या १५० टक्के आयात शुल्क आहे, जे सुरुवातीला ७५ टक्क्यांवर येईल आणि येत्या १० वर्षांत ते ४० टक्क्यांपर्यंत खाली येईल. जिन (Gin) देखील स्कॉच आणि व्हिस्कीप्रमाणे स्वस्त होईल.


लक्झरी कार्सही आवाक्यात: निसान, टोयोटासारख्या सामान्य कार्सपासून लोटस-मॉर्गन, बेंटले, जग्वार, लँडरोव्हर, मॅकलेरेन आणि रोल्स रॉयस (Rolls-Royce) सारख्या लक्झरी कार्सवरील आयात शुल्क १००% वरून थेट १०% पर्यंत खाली येईल.



सौंदर्य उत्पादने आणि खाद्यपदार्थही स्वस्त: ब्रिटनच्या लश, द बॉडी शॉप (The Body Shop), रिमेल लंडन (Rimmel London) यांसारख्या ब्रँडेड कॉस्मेटिक कंपन्यांची सौंदर्य उत्पादने स्वस्त होतील. तसेच, ब्रिटनची चॉकलेट्स आणि बिस्किटे यांसारख्या खाद्य उत्पादनांवरील आयात शुल्क किमान पातळीवर आणले जाईल. ब्रिटानिया इंडस्ट्रीजने चीज, तूप आणि पनीर यांसारख्या दुग्धजन्य उत्पादनांसाठी इतर कंपन्यांशी करार केल्याने ब्रँडेड कंपन्यांची ही उत्पादनेही स्वस्त होतील.


भारतीय कपड्यांना ब्रिटनमध्ये नवी बाजारपेठ: ब्रिटन भारताच्या कपड्यांवर आणि इतर वस्त्रोद्योगाच्या वस्तूंवर असलेले ८% ते १२% आयात शुल्क पूर्णपणे काढून टाकेल. यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनामच्या तुलनेत ब्रिटनमध्ये भारतीय कपडे अधिक स्वस्त होतील.


सेवा क्षेत्रातही संधी: ब्रिटन भारताच्या सेवा क्षेत्रासाठी नियम शिथिल करेल. कमी कालावधीच्या रोजगारासाठी भारतातून येणाऱ्या तरुणांना सवलत मिळेल आणि त्यांना सोशल सिक्युरिटी टॅक्ससारख्या गरजा लागणार नाहीत. यामुळे योग शिक्षक, शेफ, संगीतकार आणि इतर क्षेत्रातील तरुण सहजपणे ब्रिटनला जाऊ शकतील.


रत्न, आभूषणे आणि चामड्याच्या उत्पादनांना चालना: भारताच्या रत्न-आभूषणे आणि चामड्याच्या उत्पादनांना ब्रिटनमध्ये नवीन बाजारपेठ मिळेल. यावर कोणतेही शुल्क लागणार नाही, ज्यामुळे सोने-चांदीचे दागिने आणि चामड्याची उत्पादने ब्रिटनमध्ये स्वस्त होतील.


इंजिनिअरिंग आणि ऑटो सेक्टरला फायदा: ब्रिटन भारतात बनवलेल्या मशिनरी, इंजिनिअरिंग टूल्स आणि ऑटो पार्ट्सवरील आयात शुल्क रद्द करेल, ज्यामुळे भारतीय उत्पादने तिथे स्वस्त होतील. पुणे, चेन्नईपासून ते नोएडा-गुरुग्रामपर्यंतच्या उद्योगांना याचा फायदा होईल. भारतीय इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन उत्पादकांनाही दिलासा मिळेल.


आयटी आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रात नोकऱ्या: ब्रिटन भारताच्या आयटी आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रात व्हिसा नियमांमध्ये शिथिलता देईल. यामुळे इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट आणि अकाउंटिंगसारख्या क्षेत्रांमध्ये भारतीय व्यावसायिकांना ब्रिटनमध्ये नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. आयटी-फायनान्स, कायदा आणि आरोग्यसेवा क्षेत्रात पुढील ५ वर्षांत ६०,००० पेक्षा जास्त नवीन रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.


कृषी आणि खाद्य उत्पादनांची निर्यात वाढणार: भारताच्या कृषी आणि खाद्य उत्पादनांची ब्रिटनमध्ये निर्यात स्वस्त होईल. बासमती तांदूळ, प्रीमियम चहापत्ती, मसाले आणि सागरी उत्पादनावरील आयात शुल्क ब्रिटन रद्द करेल. रसायन, सौर ऊर्जा आणि प्लास्टिकपर्यंतच्या भारतीय उद्योगांनाही दिलासा मिळेल.

Comments
Add Comment

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा