मुंबईकरांसाठी गुड न्यूज, तानसा तलावही भरले

  57

मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये सुमारे ८७ टक्के पाणीसाठा


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडक सामगर तलावापाठोपाठ तानसा तलावही भरून ओसंडून वाहू लागला. बुधवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनियंनो हा तलाय ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्पाद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे सलग पाचव्या वर्षी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातच तानसा तलाव भरण्याची किमया साथली गेली आहे.


मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानस्खा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा आणि भातसा धरणामधून दिवसाला सुमारे ४ हजार दशलक्ष लिटर अर्थात ४०० कोटी लिटर पाण्याचा पुरवठा होतो.


वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४० हजार दशलक्ष लिटर अर्थात १ लाख ४४ हजार कोटी लिटर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे, या सर्व धरणांमध्ये बुधवारी १२ लाख ५७हजार ४४२ दशलक्ष लिटर पाण्याचा साठा जमा झाला आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ८६, ८८ टक्के इतका जलसाठा आहे.


मुंबईला पाणीपुरवठा करणान्या या तलावांपैकी 'हिंदुहृदयसखाट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाचे ३ दरवाजे ७ जुलै २०१५ रोजी उघडण्यात आले. तर, ९ जुलै २०२५ रोजी मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला. त्यापाठोपाठ बुधवारी तानसा तलाव देखेल ओसंडून वाहू लागला, मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली.


बुधवारी ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही १४ हजार ५०८ कोटी लिटर (१४५,०८० दशलक्ष लिटर) एकही झाली आहे.



तानसा तलाव कोणत्या वर्षी, कधी भरले


२३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.४० वाजता सन
सन २४ जुलै २०१४ रोजी पहाटे ४.१६ वाजता
रान २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता
सन १४ जुलै २०२२ रोजी रात्री ८.५० वाजता
सन २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता
सन २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता

Comments
Add Comment

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत

टेस्ला मुंबईत पहिले चार्जिंग स्टेशन सुरू करणार!

मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाने घोषणा केली आहे की, त्यांचे भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन

जुहू बीचवर २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, थरकाप उडवणारे १४ तास!

मुंबई : जुहूच्या सिल्वर बीचवर गोदरेज गेटजवळ समुद्रात वाहून गेलेल्या दोन तरुणांपैकी, विघ्नेश मुर्गेश देवेंद्रम

धक्कादायक! मुंबई IIT मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलवरून उडी मारत संपवलं आयुष्य

मुंबई : मुंबईमधील पवईमधील IIT मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.