व्हिडिओमध्ये काय म्हणाली अभिनेत्री?
तनुश्री दत्तानं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. ती म्हणाली, “मी गेल्या ४-५ वर्षांपासून माझ्या घरातच छळाला सामोरी जात आहे. त्रासून मी पोलिसांना फोन केला आणि पोलीस आले. पोलिसांनी सांगितले की, तुम्ही पोलीस ठाण्यात येऊन प्रकरणाची संपूर्ण माहिती द्या आणि तुमची तक्रार नोंदवा. कदाचित मी उद्या तिथे जाईन कारण माझी तब्येत ठीक नाही. मी खूप काळापासून त्रस्त आहे आणि गेल्या ५ वर्षांपासून हे सगळं सहन करत आहे. माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मी आजारी आहे, मी काही कामही करू शकत नाही.” मात्र, या संपूर्ण व्हिडीओमध्ये तनुश्रीने कोणाचेही नाव घेतलेले नाही. ती नेमकं कोणाविषयी बोलत आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नवीन उपराष्ट्रपतीपदासाठीची अनेक मोठ्या नावांची चर्चा आहे. ज्यामध्ये नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, रामनाथ ठाकूर, ...
"कुणीतरी माझी मदत करा, नाहीतर खूपच उशीर होईल..."
तनुश्री दत्तानं व्हिडीओमध्ये पुढे म्हटलंय की, "मला खूप त्रास देण्यात आला आहे, गेल्या ४-५ वर्षांत की, माझी तब्येत बिघडली आहे. मी काहीच काम करू शकत नाहीये, माझं संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालंय, मी हाऊस हेल्परही ठेवू शकत नाही... त्या लोकांनी माझ्या घरात एक हाऊस हेल्पर ठेवलेली, तिच्यामुळे मला अत्यंत वाईट अनुभव आलाय. यायचं आणि चोरी करुन निघून जायचं... मला सर्व कामं स्वतःच करावी लागतायत... मी माझ्याच घरात खूपच अडचणींमध्ये सापडली आहे... कृपया कोणीतरी मला मदत करा. खूप उशीर होण्यापूर्वी काहीतरी करा."
तनुश्री दत्ता कोण आहे?
तनुश्री दत्ताने २००४ मध्ये 'फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स'चा किताब जिंकला आणि मिस युनिव्हर्स २००४ मध्ये टॉप १० मध्ये स्थान मिळवलं. ती २००५-२०१० आणि २०१३ या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होती.