Saraswat Bank: सारस्वत बँकेच्या संचालक मंडळाकडून न्यू इंडिया बँकेशी एकत्रीकरणावर 'ग्रीन' सिग्नल!

मोहित सोमण:सारस्वत को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेशी एकत्रीकरण (Amalgamation) करण्यास मंजुरी दिली आहे. बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. ज्यात त्यांनी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक (NICB) व सारस्वत बँक (Sarswat Bank) यांना ३१ जुलैपर्यंत आपल्या ताळेबंद जमाखर्च मांडण्यासाठी तसेच बँलन्स शीट आरबीआयला सादर करण्यासाठी संचालक मंडळाला सांगितले. यापूर्वी नियामक बँकेने (RBI) ने न्यू इंडिया बँकेवर क थित १२२ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यामुळे न्यू इंडिया बँकेच्या ग्राहकांना बँकेवर निर्बंध पडल्यामुळे ग्राहकांना आपले खाते हाताळण्यास खूप मर्यादा होत्या. अखेर यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एकत्रीकरणानंतर बँकेच्या विस्ताराबरोबर ग्राह कांना विनासायास व्यवहार करता येतील हे स्पष्ट झाले आहे.

याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना बँकेचे सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर म्हणाले की,' सारस्वत बँकेने विलीनीकरणाच्या प्रस्तावासह मध्यवर्ती बँकेकडे संपर्क साधल्यानंतर रिझर्व्ह बँकेने तत्वतः मान्यता दिली आहे आणि अंतिम मंजुरी दोन्ही बँकांच्या भाग धारकांवर अवलंबून असेल. विलीनीकरणानंतर, सारस्वत बँक न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व मालमत्ता आणि दायित्वे ताब्यात घेईल आणि ठेवीदारांचे हित पूर्णपणे संरक्षित केले जाईल.'

साधारणतः उपलब्ध माहितीनुसार,ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत एकत्रिकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या दोन्ही बँका आपले कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहेत. यापूर्वी न्यू इंडिया बँकेच्या खातेदारांना केवळ २५००० रूपये खात्यातून काढण्याची परवानगी मिळा ली होती. बिघडलेली आस्थापना, बिघडलेले व्यवस्थापन (Corporate Governance) या पार्श्वभूमीवर आरबीआयने न्यू इंडिया बँकेवर कठोर निर्णय घेतला होता. त्यामुळेच या एकत्रीकरणानंतर बँक ग्राहकांच्या चिंतेला तिलांजली मिळणार आहे.

सारस्वत बँक ही भारतातील सर्वात मोठी सहकारी बँक ओळखली जाते. सारस्वतने गेल्या काही वर्षांतच सातहून अधिक बँकेचे अधिग्रहण केले होते. सारस्वत बँकेने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत ५१८.२५ कोटींचा निव्वळ नफा (Net Profit) नोंदवला होता. तर बँकेच्या स्थूल एनपीए (Gross Non Performing Assets NPA) केवळ २.२५% राहिला होता. बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने कंपनीने हा निकाल नोंदवला.
Comments
Add Comment

Jalgaon Crime : दोन तरुणांशी वाद अन् बियर बार मालक सरपंचाचा हवेत गोळीबार , नेमकं काय घडलं ?

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे गुरुवारी रात्री हवेत गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित संजय गरुड यांचा जामीन अर्ज मागे

Shalarth ID Scam : नाशिकच्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आणि शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड

Raksha Bandhan AI Prompts : रक्षाबंधन होईल अतिशय खास! फक्त हे सोपे AI Prompts वापरा अन् बनवा भावा-बहिणीचे सर्वात सुंदर फोटो

सध्या सोशल मीडियावर AI फोटो जनरेशनचा मोठा ट्रेंड सुरू आहे. या रक्षाबंधनाला भाऊ आणि बहिणीचे

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये