शस्त्राचा दाखवला धाक
दुपारी रिक्षात एका अनोळखी इसमाने रिक्षात शिरला १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना वांद्रे येथे घडली. रिक्षा सिग्नलला थांबली असताना आरोपी रिक्षात शिरला आणि चालकाला शस्त्राचा धाक दाखवून रिक्षा सुरू ठेवायला सांगितली. यानंतर त्याने धावत्या रिक्षात मागील आसनावर बसलेल्या महाविद्यालयीन तरूणीचा विनयभंग केला.
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नवीन उपराष्ट्रपतीपदासाठीची अनेक मोठ्या नावांची चर्चा आहे. ज्यामध्ये नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, रामनाथ ठाकूर, ...
तरुणी या प्रकाराने घाबरली
सोमवारी दुपारी तरुणीने नेहमीप्रमाणे एस. व्ही. रोड येथील बॉस्टन हॉटेलजवळून एक रिक्षा पकडली. दुपारी १२ च्या सुमारास रिक्षा सायबा हॉटेलजवळील सिग्नलवर थांबली, त्यावेळी रस्त्यावर गर्दी होती. काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक इसम अचानक रिक्षात शिरला. पीडित तरुणी १६ वर्षांची असून वांद्रे येथे राहते. दररोज दुपारी ती रिक्षाने महाविद्यालयात जाते.
रिक्षा थांबवायची नाही, अन्यथा मारून टाकेन
पीडित तरुणीने आणि रिक्षाचालकाने त्याला खाली उतरायला सांगितले. मात्र तो उतरायला तयार नव्हता, मला काही अंतरच पुढे जायचे आहे. दुसरी रिक्षा मिळत नाही असे सांगून तो जबरदस्तीने आत बसून राहिला. तरुणी आणि रिक्षाचालक त्याला उतरायला सांगत असतानाच सिग्नल सुटताच त्याने धारदार शस्रासारखी एक वस्तू काढली. रिक्षा थांबवायची नाही, अन्यथा मारून टाकेन अशी धमकी त्याने दिली. या प्रकारामुळे रिक्षाचालक आणि ती तरुणी दोघेही घाबरले. रिक्षा सुरू होताच त्याने अश्लील शेरेबाजी करीत तरुणीचा विनयभंग केला. पुढील सिग्नलवर रिक्षा थांबल्यावर तो उतरून पळून गेला. या प्रकारामुळे तरूणी प्रचंड घाबरली होती. ती महाविद्यालयात न जाता घरी परत आली. तिने हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.