Dombivali Fire : डोंबिवलीत अग्नितांडव! एमआयडीसीतील दोन कंपन्यांना भीषण आग

डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (MIDC) परिसरात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एरोसेल आणि विश्वनाथ गारमेंट या २ कंपन्यांना भीषण आग लागली असून आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहे. MIDC परिसरात ही आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.




एरोसेल आणि विश्वनाथ गारमेंट कंपनीला आग


मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी फेज वन परिसरात असलेल्या विश्वनाथ गारमेंट कंपनीला दुपारी अचानक आग लागली. त्यानंतर ती आग एरोसेल कंपनीपर्यंत पोहोचली. या आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूर येथील अग्निशमन दलाच्या ३ ते ४ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. विश्वनाथ गारमेंट कंपनी ही कापडावर प्रक्रिया करणारी कंपनी आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.



आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू


या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस यंत्रणाही तातडीने घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिसांनी परिसरातील गर्दी हटवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली. आग लागलेल्या कंपनीत काही कर्मचारी अडकल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही आग नेमकी कशी लागली आणि आग लागण्याचं कारण काय, याबाबतचा तपास सध्या सुरू आहे. या आगीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल