संसदेत गोंधळ, जनतेच्या पैशांचा अपव्यय

संसदेत गोंधळ, कोट्यवधींचा चुराडा


नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू झालंय. मात्र पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालं. प्रत्येक मिनिटाला सुमारे अडीच लाख रुपये खर्च होणाऱ्या या संसदेच्या २१ दिवसांच्या अधिवेशनासाठी तब्बल १८९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा पैसा जनतेच्या करातून येतो आणि गोंधळामुळे तो वाया जातोय? यावर सरकारसह विरोधक गंभीर नाहीत का, जनतेच्या पैशांचा कशासाठी चुराडा केला जातोय.

?si=29b8FYf-Ju5U6IHJ

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासातच लोकसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं. दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं. विरोधकांनी बिहारमधील निवडणूक आयोग प्रक्रिया आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली. सरकारनं सर्व विषयांवर चर्चेसाठी तयारी दाखवली, मात्र विरोधकांनी गोंधळ घातलाच. संसदेचा प्रत्येक मिनिटाचा खर्च हा जनतेच्या खिशातून जातो. जर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एखाद्या विषयावर योग्य चर्चा केली तरच हा पैसा देशाच्या विकासासाठी खर्च होईल. मात्र गोंधळामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होतोय. हा गोंधळ नवीन नाही. मागील काही वर्षांत पेगासस प्रकरण, राफेल करार, हिंडनबर्ग अहवाल यांसारख्या मुद्द्यांवर विरोधकांनी संसदेचं कामकाज ठप्प केलंय.



२०२३च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हिंडनबर्ग अहवालावरून आणि बीबीसीच्या प्रचारात्मक माहिती पटावरूनही गोंधळ घातला. त्यामुळे संसदेचा वेळ आणि जनतेचा बराच पैसा वाया गेला. संसदेचा प्रतिमिनिट खर्च अडीच लाख रुपये आहे. यंदा २१ दिवसांत १२६ तास म्हणजेच ७५६० मिनिटांच्या कामकाजाचे नियोजन आहे. या हिशोबाने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा खर्च १८९ कोटींच्या घरात जातो. यात खासदारांच्या प्रतिदिन भत्त्याच्या अडीच हजार रुपयांसह इतर अनेक खर्चांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे