साईबाबांची बदनामी करणाऱ्या माथेफिरुविरुद्ध शिर्डीत गुन्हा दाखल

शिर्डी : श्री साईबाबांची बदनामी करणाऱ्या एका माथेफिरू व्यक्तीविरोधात साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या संतापजनक प्रकाराची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी गाडीलकर यांच्या निदर्शनास आणून देताच विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन गाडीलकर यांनी तत्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला. संस्थानच्या इतिहासात अशाप्रकारे प्रथमच सर्वोच्च अधिकाऱ्याने श्रीसाईबाबांच्या बदनामीचा विषय गंभीरपणे घेत स्वतःच फिर्याद दाखल केली.


स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्या युवराज उर्फ तलवार बाबा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या व्यक्तीने साईबाबा मुसलमान होते आणि ते मांसाहार करायचे, व्यभिचार करायचे, त्यांची मूर्ती मंदिरातून काढून नाल्यामध्ये टाकून द्या असे धार्मिक तेढ निर्माण करणारे आवाहन असलेले व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत. या व्हिडिओमुळे सर्व धर्मियांतील अनेक साईभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.


या मुद्यांवर ही फिर्याद करण्यात आली आहे. श्रीसाईबाबांची बदनामी करणाऱ्या या घटनेमुळे साईभक्तांमध्ये संतापाचे वातावरण असून, बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे अधिक तपास करत आहेत.


युवराज उर्फ तलवार बाबा याचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जावी अशी जोरदार मागणी भाविक करत आहेत. साईबाबा हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक मानले जातात आणि त्यांची बदनामी करणाऱ्या अशा कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही असे साई संस्थानने स्पष्ट केले आहे. यामुळे धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सनदशीर मार्गाने योग्य तो धडा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

नागपुरात जड वाहनांना लाल सिग्नल : या वेळेत प्रवेश बंद !

नागपूर : नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांच्या त्रासाचा विचार करून वाहतूक

कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क

गणेशोत्सवाला गालबोट - पुण्यात गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

पुणे : ऐन गणेश विसर्जनाच्या तयारीत असतानाच पुण्यामध्ये सणाला गालबोट लागले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या

मराठा आरक्षण - मृतांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत

मुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरीता ज्यांनी आत्महत्या केली किंवा आंदोलना दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला. अशा

Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व