मुंबई : दक्षिणेतील अनेक बड्या स्टार्सवर आता ईडीने आपली पकड घट्ट करण्यास सज्ज आहे. सोमवारी ईडीने विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती, प्रकाश राज आणि लक्ष्मी मंचू यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींना समन्स पाठवून ईडीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणात या कलाकारांना समन्स पाठवले आहेत. ईडीने या कलाकारांना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अॅप्सचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली राणा दग्गुबाती, विजय देवरकोंडा, प्रकाश राज आणि लक्ष्मी मंचू यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना ईडीने समन्स पाठवले आहेत. या सर्व कलाकारांनी सोशल मीडियावर अशा अॅप्सचा प्रचार केला होता ज्यांना देशात बेकायदेशीर घोषित करण्यात आले आहे.