मुंब्रा बायपास मार्गावर १ कोटी ६९ लाख किंमतीचे एमडी ड्रग्स जप्त

ठाणे : सोमवारी ठाणे शहरात एमडी ड्रग्स आढळून आले आहे. हे सर्व ड्रग्स जप्त करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली. तब्बल १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. ठाणे गुन्हे शाखा घटक १ तर्फे ही कारवाई करण्यात आली.


ठाणे गुन्हे शाखेला गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की मुंब्रा बायपास मार्गावर एक इसम त्याच्या वाहनांमधून एमडी हा अमली पदार्थ घेऊन जाणार आहे. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंब्रा बायपास जवळ सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार कारमधून संशयास्पदरित्या जाणाऱ्या मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा यास ताब्यात घेऊन गाडीची तपासणी करण्यात आली.


हा सर्व साठा हस्तगत करून त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून आरोपींनी हा अमली पदार्थ कुठून आणला व कोणाला विक्री करणार होता याचा तपास पोलिस करत आहेत.


ठाणे पोलिस आयुक्तालय परिक्षेत्रामध्ये अमली पदार्थांच्या सेवांमध्ये तसेच विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तरुण पिढी या अमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसत आहे. अमली पदार्थांच्या सेवन व विक्रीवर तसेच नशामुक्त तरुण पिढी करण्याच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सर्व विभागांना आदेश देत कारवाईचे निर्देश दिले होते.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या