Gold Rate: सोन्यात सलग पाचव्यांदा किरकोळ वाढ 'या' कारणामुळे !

  66

प्रतिनिधी: सोन्याच्या दरात आज पाचव्यांदा किरकोळ वाढ कायम राहिल्याने सोने आणखी महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावाचा फटका सोने दरपातळीला सातत्याने बसत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने कमोडिटी आणखी महाग झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २२ तारखेला २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपयांने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपयाने वाढ झाल्याने एकूण दरपातळी प्रति ग्रॅम २४ कॅरेट १००१६ रूपयांवर, २२ कॅरेट ९१८१ रूपयांवर, १८ कॅरेट ७५१२ रूपयांवर गेली.

संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १० रूपयांने वाढ, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १०, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १० रूपयाने वाढ झाली आहे. परिणामी सोन्याचे दर प्रति तोळा २४ कॅरेट १००१६०, २२ कॅरेट ९११८०, १८ कॅरेट ७५१२० रूपयावर गेली आहे. मुंबईसह, भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी दर प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटला १००१६, २२ कॅरेटला ९१८१ रूपयांवर आहेत. ही सराफा बाजारातील सलग पाचव्यांदा वाढ होत आहे. चांदीची वाढ स्थिर झाल्यावर पुन्हा एकदा सोन्याच्या उसळीला नवा वेग प्राप्त झाला आहे. सतत वाढणारी पातळी गाठल्याने सोने नव्या उच्चांकावर (All time High) गेले आहे.

सकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात (Gold Futures Index) यामध्ये मात्र (०.०२%) घसरण झाल्याने आजची वाढ किरकोळ अथवा नियंत्रित राहिली. सकाळपर्यंत युएस गोल्ड स्पॉट दरात (US Gold Spot) निर्देशांकात ०.१७% घसरण झाल्याने पुन्हा किंमत पातळी प्रति डॉलर ३३९१.५२ औंसवर गेली आहे. भारतातील कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Mutli Commodity Exchange MCX) यामध्ये मात्र सकाळपर्यंत १.३५% वाढ झाल्याने भारतीय बाजारातील सोन्याची दरपातळी ९९३५०.०० रूपये प्रति तोळा गेली आहे.

सोन्याच्या जागतिक वाढीमुळे त्याचा फटका बसत असला तरी अधिक फटका भारतीय शेअर बाजारातील रूपयांच्या अस्थिरतेचाही अधिक फटका सोन्यात बसला. मागच्या आठवड्यात परदेशी चलनातही घसरण झाल्याने सोन्यावर अधिक दबाव निर्माण झाला. आरबीआयकडून यापूर्वी ११ महिने सहज पुरेल इतका चलनसाठा असल्याचे म्हटले गेले असली तरी रूपयाची होणारी घसरण दे खील टेरिफ मधील संभाव्य दरवाढ लक्षात घेता आणखी हानीकारक ठरू शकते. प्रत्यक्ष सोन्याबरोबरच ईटीएफ मधील वाढलेली गुंतवणूक पाहता ही मागणी कुठपर्यंत जाईल हे सांगणे कठीण असले तरी पुढील व्याजदर कपातीची घोषणा होईपर्यंत सोन्याच्या दरात स्थित्यंतरे अपेक्षितच आहेत.
Comments
Add Comment

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

पिंपळी नदीवरील ५० वर्ष जुना पूल खचला, पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद

चिपळूण: सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी लोकं मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. त्यामुळे या काळांत

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी