काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या विधानावर भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा जो दुर्दैवी व आक्षेपार्ह प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला ते केवळ ऐतिहासिक अज्ञानच नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाला आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जबरदस्तीने धर्मांध राजवटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टीपू सुलतानशी करणं म्हणजे इतिहासाचा अपमान आहे.


काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या या विधानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या विधानाबद्दल केवळ माफी नव्हे, तर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करावं


या संदर्भात उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. काँग्रेसच्या या विधानाला तुम्ही पाठिंबा देता का? तुमच्या कथित हिंदुत्वाच्या व्याख्येत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान बसतो काय? घराबाहेर या, महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभे राहा आणि स्पष्ट उत्तर द्या.


छत्रपती शिवाजी महाराजांबाबत तडजोड, तुलना किंवा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. जो कोणी त्यांच्या तेजस्वी इतिहासाला धक्का देईल, त्याला महाराष्ट्राची जनता योग्य जागा दाखवेल.

Comments
Add Comment

IND vs SL 1st Test: मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये! श्रीलंकेच्या अनुभवी खेळाडूला दुखापत; गॉल टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेच्या

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Nashik : आई-बाबा घराबाहेर पडले अन् घरी येताच पायाखालची जमीन सरकली, दोन चिमुकल्या लेकींचा मृत्यू ; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं ?

Nashik News : आपलं घर असावं, हसतं खेळतं कुटुंब असावं आणि आपल्या मुलांचा भविष्य उज्ज्वल असावं असं प्रत्येकालाच वाटतं

Nashik TCS Case : एमएआयएम नगरसेवक मतीन पटेलला जामीन

Nashik TCS Case : नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस कंपनीतील (TCS Company) अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न

CM Devendra Fadnavis : सहकारी पक्षातील मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा अंकुश

- कोणत्याही मंत्र्यांचे निर्णय फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकार; शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात