इटर्नल (Zomato ,Blnkit) या कंपन्यांची मुख्य कंपनी आहे. कंपनीने या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात संख्यात्मक घट नोंदवली असली तरी कंपनीत चांगली स्थिरता असल्याने हा कौल गुंतवणूकदारांना दिला. कंपनीला मागील तिमाहीतील २५३ कोटींच्या तुलनेत घसरण होत या तिमाहीत २५ कोटींचा निव्वळ नफा झाला. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७०% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला ४२०६ कोटींचा महसूल मिळाला होता जो वाढत ७१६७ कोटींवर गेला आहे. करपूर्व कमाई ईबटा (EBITDA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४२% घसरण झाली होती. कंपनीने शेअर्समध्ये ३.१% वाढ झाली होती.