किल्ले रायगडावरून परतलेल्या पर्यटकांच्या बसला अपघात

दहा जण किरकोळ जखमी


माणगाव : पावसाळी पर्यटनासाठी किल्ले रायगड आणि पुनाडेवाडी घरोशी वाडी येथील मनमोहक दृश्य आणि कोकणातील पावसाळी बहुविध निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे शहर तसेच राज्यातून विविध पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. माणगाव किल्ले रायगड मार्गावर माणगाव घरोशी गावाच्या हद्दीत एका खासगी बसला झालेल्या अपघातात दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले.


शनिवार, रविवार या दोन दिवशी रायगडावर पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होत आहे. रविवारी पुणे येथून खासगी बसने टाटा कंपनीचे कर्मचारी गडावर आले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. खासगी बस घरोशी गावाच्या हद्दीत पलटी झाली. यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. या प्रवाशांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात रस्त्यावर तीव्र उतार असल्याने गाडी घसरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

महाडमध्ये ५ गट आिण १० गणांसाठी २०३ मतदान केंद्र

१६ ते २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत महाड वार्तापत्र संजय भुवड महाड : तालुक्यात ५ जिल्हा

नवी मुंबई विमानतळाने ओलांडला १ लाख प्रवाशांचा टप्पा

विमान उड्डाणांच्या संख्येत लक्षणीय वाढ नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) एका

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची