AC लोकल ट्रेनला गळती; जास्त पैसे देऊन देखील प्रवाशांना मनस्ताप!

  65

मुंबई : सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणी भरले आहे. अशातच आज सकाळी , मुंबईच्या AC लोकल ट्रेनमधील एसी व्हेंटमधून पावसाचे पाणी गळत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबईत जोरदार पावसामुळे एसी लोकलमध्ये पाणी शिरले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना या समस्येचा सामना करावा लागला .


प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने AC लोकल सेवा सुरु केली . सामान्य लोकलपेक्षा AC लोकलचे तिकीट दर जास्त असतात . परिणामी जास्त पैसे देऊन देखील प्रवाशांना अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे .


सकाळ सकाळी नोकरदारवर्ग घाईघाईत आपआपल्या कामावर जाण्याच्या घाईत असतो . पावसामुळे लोकल ट्रेन च्या वेळापत्रकात देखील बदल होत असतो त्यातच एसी लोकल ट्रेनमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला आहे . काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करत रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे .


प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे . मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे . या घटनेमुळे मुंबईच्या रेल्वे व्यवस्थेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपुर्वी दिवा येथे लोकलमधून पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने मुंबईच्या सर्व लोकल एसी करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता. जेणेकरुन लोकलच्या दारावर कोणालाही लोंबकळता येणार नाही. परंतु लोकलची दार बंद केल्यानंतरही जर प्रवाशांची गैरसोय होणार असेल तर प्रवाशांनी काय करावं? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.

Comments
Add Comment

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक