केरळच्या महिलेचा UAE मध्ये संशयास्पद मृत्यू : हुंड्यासाठी बळी घेतल्याचा कुटुंबाचा आरोप

UAE : केरळच्या कोल्लम येथील २९ वर्षीय महिलेचा मृतदेह संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये शारजाह येथील अपार्टमेंटमध्ये आढळला आहे . तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे . अथुल्याच्या आईने आरोप केला आहे की तिचा पती हुंड्यासाठी तिचा छळ करत होता , २ दिवसांपूर्वी सतीशने अथुल्याचा गळा आवळला, तिच्या पोटात लाथा मारल्या आणि तिच्या डोक्यात देखील मारले, अथुल्याच्या कुटुंबाने केलेल्या आरोपानंतर कोल्लम पोलिसांनी तिच्या पतीविरोधात हुंडाबळी आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे .


मृत अथुल्या शेखर हिचा विवाह २०१४ मध्ये कोल्लम येथील रहिवासी असलेल्या सतीशशी झाला होता . तिच्या कुटुंबाने लग्नाच्या वेळी सतीशला ४० तोळे सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी दिल्याची माहिती समोर आलीय . परंतु त्याने ते पुरेसे नसल्याचे सांगितले आणि तिच्याकडून आणखी हुंडा मिळावा यासाठी तो अथुल्याला त्रास देत असे . १९ जुलै रोजी सकाळी तिचा मृतदेह शारजाह येथील तिच्या फ्लॅटमध्ये आढळला. घरात मल्याळममध्ये लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे, जी मृत अथुल्याने लिहिली असल्याचे समजतंय . यात तिने म्हटले आहे की तिचा पती आणि सासरचे लोक हुंड्याच्या मागणीवरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते.


अथुल्याचे वडील राजशेखरन यांनी "माझी मुलगी आत्महत्या करेल असे मला वाटत नाही. तिचे तिच्या मुलीवर खूप प्रेम आहे. तिचा खून झाला आहे," असे सांगितले. त्यांनी दावा केला की तिचा नवरा मद्यपी आहे आणि नेहमीच तो तिला मारहाण करायचा .


"तिला दररोज होणाऱ्या सर्व छळाला ती सहन करत होती. तिने तिच्या मुलीसाठी हे सर्व सहन केले. यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्या. पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेमके काय घडले हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे," असंही ते म्हणाले.


तिच्या कुटुंबाने व्हिडिओ देखील दाखवले आहेत ज्यात अथुल्याला जखमांच्या खुणा दिसत आहेत आणि तिचा नवरा तिला मारहाण करण्यासाठी स्टूल उचलताना दिसत आहे.


थेक्कुंभगम पोलिसांनी सतीशविरुद्ध कलम ८५, ११५(२), ११८(१), १०३(१) आणि हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ च्या कलम ४ आणि ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Comments

Manisha    July 22, 2025 08:29 AM

Parents also responsible because why u prestressed ur daughter to live with stupid husband till her death

Add Comment

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१