८ वर्षांनंतरही 'दयाबेन'ची प्रतीक्षा कायम; असित मोदी म्हणतात, "दिशा वकानीला परत आणणं सोपं नाही..."

  98

मुंबई: छोट्या पडद्यावर गेल्या १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' सध्या पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी पोहोचली आहे. भूताच्या ट्रॅकमुळे प्रेक्षकांची पसंती मिळवत या मालिकेने इतर अनेक मालिकांना मागे टाकले आहे. सध्या मालिकेत जेठालाल गडा या पात्रावर लक्ष केंद्रित केले जात असले तरी, प्रेक्षकांना अजूनही दयाबेन या पात्राची आणि ती साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिची आठवण येत आहे. चाहते सातत्याने निर्मात्यांना दिशाच्या पुनरागमनाबद्दल विचारणा करत आहेत.


निर्माते असित मोदी काय म्हणाले?


'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेनच्या पुनरागमनावर आणि मालिकेच्या यशाबाबत बोलताना सांगितले की, "प्रेक्षक दयाबेन मालिकेत कधी परतणार याबद्दल सतत विचारत असतात. दिशाजींनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर खोल छाप सोडली आहे. त्यांनी मालिका सोडून आठ वर्षे झाली आहेत, तरीही लोक त्यांना आठवतात. त्यांनी साकारलेले पात्र अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे, इतक्या उत्तम पद्धतीने त्यांनी ती भूमिका साकारली होती."


दिशा वकानीला मालिकेत परत आणण्याबद्दल बोलताना असित मोदींनी स्पष्ट केले की, "दिशाजींना परत आणणं सोपं नाही, त्यासाठी योग्य वेळ आणि योग्य परिस्थितीची आवश्यकता आहे." सध्या ते मालिकेच्या कथाकथनावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले. "जेव्हा कथा मजबूत असते, तेव्हा लोक आपोआप कथानकाशी जोडले जातात. एखाद्या पात्राची अनुपस्थिती फारशी जाणवत नाही. हा शो नेहमीच त्याच्या कथेमुळे टिकून राहिला आहे. जोपर्यंत आम्ही मनोरंजक कंटेंट देत आहोत, तोपर्यंत काही पात्रे मालिकेत असोत किंवा नसोत, लोक जोडलेले राहतात," असेही मोदींनी नमूद केले.


यावरून तरी, नजीकच्या भविष्यात दिशा वकानी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत परतण्याची शक्यता कमीच असल्याचे दिसते. मात्र, दयाबेनच्या पात्राची क्रेझ आजही कायम असल्याचे निर्मात्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते.

Comments
Add Comment

गोविंदा फक्त माझाच! घटस्फोटाच्या चर्चांना सुनीता आहूजा यांनी दिला पूर्णविराम

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची

Swwapnil Joshi: मिठाईऐवजी अर्धा किलो तांदूळ आणा...घरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्यांसाठी स्वप्नील जोशीचं आवाहन

मुंबई: आजपासून दहा दिवस राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2025) धामधूम पाहायला मिळणार आहे, घराघरात आणि विविध सार्वजनिक

रणबीर-आलियाच्या नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आलिया संतापली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत एक नवं घर बांधत आहेत, ज्याची किंमत

गोडवा आणि तिखटपणाची मेजवानी – ‘वडापाव’ चित्रपटाचा चविष्ट टीझर प्रदर्शित!

मुंबई : मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीत वडापावचं स्थान खास आहे . वडापाव म्हटलं की जिभेला पाणी सुटतं. वडा जसा

२५० कोटींचा अलिशान बंगला तयार, रणबीर-आलिया लवकरच करणार गृहप्रवेश

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर अखेर तयार झाले आहे. गेल्या अनेक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात