तो फेक व्हिडिओ आहे! मी कोकाटेंच्या मागेच बसतो, भाजप आमदार परिणय फुकेंनी केली कृषिमंत्र्यांची पाठराखण

  110

AI च्या माध्यमातून तयार झालेला हा फेक व्हिडिओ असल्याचा दावा


मुंबई: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे सभागृहात मोबाईलवर जंगली रमी ॲपवर गेम खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला, आणि राजकीय पटलावर एकच वादळ निर्माण झाले. विरोधकांनी कोकाटेंवर निशाणा साधला, मात्र "मी यु ट्यूबवरील जाहीरात स्किप करत होतो" असे माणिकराव कोकाटे यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आपले स्पष्टीकरण दिले. मात्र तरीसुद्धा विरोधकांचे काही समाधान झालेले नाही. त्यामुळे आता भाजप आमदार परिणय फुके यांनी व्हायरल व्हिडीओ खोटा असल्याचा दावा करत कोकाटेंची नाहक बदनामी केला जात असल्याचा दावा केला आहे.
यापूर्वी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील कोकाटे यांची बाजू घेतली होती. त्यांनतर आता भाजपचे आमदार आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके (Parinay Phuke ) यांनी देखील कोकाटे यांची बाजू धरली आहे. हा व्हिडिओ AI च्या माध्यमातून तयार करुन कोकाटेंची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा फुकेंनी केला आहे.



नेमकं काय म्हणाले परिणय फुके?


कोकाटे जिथं बसतात तिथेचं मी त्यांच्या मागं बसतो. मी कधीही माणिकराव कोकाटे यांना असं गेम खेळताना बघितलेलं नाही. सभागृहाच्या आत कुणीही आपापले मोबाईल बघतात, आम्ही पण बघतो. काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आम्ही गुगलच्या माध्यमातून, चाटच्या माध्यमातून ते घेत असतो. मला असं वाटते की ते तेच करत असावेत. मात्र, त्यांचा तसा व्हिडिओ घेऊन AI च्या माध्यमातून जंगली रमीचा व्हिडिओ टाकून मंत्री कोकाटे यांना बदनाम करण्याचं काम रोहित पवारांच्या माध्यमातून होत असल्याचे फुके म्हणाले.



संजय राऊत यांना टोला


संजय राऊत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी रोज भांडी धूनी करतात असे म्हणत आमदार परीणय फुकेंनी संजय राऊत यांना टोला लगावला. अमित शाह यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. सध्याच्या मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना बदलणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यावर भाजप आमदार परीणय फुके यांनी, संजय राऊत हे अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी धुनीभांडी करीत असेल म्हणूनचं त्यांना हे सर्व माहीत होत असेल असा टोला लगावला.

Comments
Add Comment

बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरेंच्या घरी जाणार उद्धव ठाकरे

मुंबई : गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत.

लवकरच तानाजी सावंतांचे राजकीय पुनर्वसन होणार ?

मुंबई : भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात स्थान दिलेले

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचे तीन ठिकाणी मतदान! भाजपचा आरोप, मुख्यमंत्री म्हणाले "आता खरे वोट चोर कोण?"

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील एकूण ९ सदस्यांचे दुबार तिबार मतदान सांगली : काँग्रेस

काँग्रेस खासदाराच्या घरात फूट, दिराचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : काँग्रेसच्या चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि काँग्रेसचे दिवंगत नेते बाळू (सुरेश)