सलमान खान 'बॅटल ऑफ गलवान' साठी सज्ज

मुंबई : सलमान खान त्याच्या नवीन चित्रपटासाठी जबरदस्त तयारी करत आहे. तो या चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारणार आहे. त्याने त्यासाठी तयारी देखील सुरू केली आहे. ज्या चित्रपटासाठी तो अनेक महिन्यांपासून प्रशिक्षण घेत आहे तो म्हणजे बॅटल ऑफ गलवान. अपूर्व लाखिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत . हा चित्रपट गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित आहे . या चित्रपटात सलमानसोबत चित्रांगदा सिंग असेल .


या चित्रपटासाठी सलमान खानने त्याच्या आहारातही बदल केला आहे. त्याने बरंच वजनही घटवलं आहे आणि त्याचबरोबर तो व्यायामही करतोय. असे म्हटले जात आहे की त्याने दारूही सोडली आहे. सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान'साठी मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये एक सेट बांधला जात आहे.


सलमान खान ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 'बॅटल ऑफ गलवान'चे शूटिंग सुरू करणार आहे. जे सध्या मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये होणार आहे. तिथली डिझाईन टीम आता सेट बनवत आहे. हा सेट या महिन्याच्या अखेरीस तयार होईल. तो १०-१२ दिवसांसाठी चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. त्यानंतर संपूर्ण टीम लडाखला जाऊन चित्रपटाचे काम पूर्ण करेल. लडाखला जाण्यापूर्वी, अनेक पात्रांची सुरुवातीची दृश्य मुंबई येथे शूट केली जाणार आहेत.


अनेक अ‍ॅक्शन सीन्स लडाखमध्ये शूट केले जातील. लडाख मधील शूटिंग थोडे कठीण असणार आहे . त्यात लढाई प्रशिक्षण, रात्रीचे शूटिंग आणि मोठ्या प्रमाणात सिम्युलेटेड युद्ध दृश्ये असतील. यासाठी सलमानला शारीरिकदृष्ट्या अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे .

Comments
Add Comment

सुपरस्टार अक्षय कुमारची संपत्ती किती ?

मुंबई : बॉलीवूड हे स्वप्नांचे शहर आहे, जिथे मेहनत, चिकाटी आणि अभिनयाच्या जोरावर सामान्य माणूसही सुपरस्टार बनू

अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाचे निदान

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाहच्या आयुष्यात झाली 'ती'ची एन्ट्री

मुंबई : गणेशोत्सव सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. अनेकांनी त्यांच्या नव्या

‘जॉली एलएलबी ३’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाचा वाद वाढतच चालला आहे. जॉली एलएलबी

गणरायाच्या आगमनाचा ‘कुली’ चित्रपटाला फायदा

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त तीन चित्रपट उत्तम कमाई करत आहेत. एकीकडे ‘कुली’ आणि ‘वॉर २’ हे दोन मोठे चित्रपट चांगली

पार्थ पवार-जॅकलिन जोडीने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी विविध