मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक उड्डाण पूल अद्यापही अपूर्णच

  57

टोलवसुलीसाठी सुकेळी खिंडीत जोरात तयारी सुरू


अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक उड्डाण पूल अपूर्णावस्थेत असतानाही मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्वात विवादित कासू ते इंदापूर या ४२.३ किलोमीटर अंतराच्या टोलवसुलीसाठी सुकेळी खिंडीत गाठण्याची तयारी सध्या जोरात सुरू झाली आहे. खिंडीच्या पायथ्याशी भव्य टोलप्लाझा उभारला जात असून, या टोलप्लाझाचे काम अंतिम टप्प्यात आहे.


टोल वसुलीसाठी आता केवळ अधिसूचना निघणे बाकी असून, जानेवारी महिन्यापासून या टप्प्यातील टोल वसुली करण्यास सुरुवात करावी लागेल, असे म्हणणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे आहे. महामार्गाच्या या पहिल्या टप्प्यातील नागोठणे, कोलाड नाका येथील प्रमुख उड्डाण पुलांची कामे अद्याप ४० टक्के देखील पूर्ण झालेली नाहीत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी अपूर्ण कामांमुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. सध्या पडणाऱ्या पावसामुळे झालेल्या चिखलातून वाहने चालवावी लागत आहेत, अशाच कंबरतोड प्रवासानंतरही कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोल भरावा लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशाने या टप्प्याचे काम या वर्षीच्या डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे; परंतु सध्या सुरू असलेल्या कामाचा वेग पहाता, ही डेडलाईन पुन्हा हुकणार असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक डेडलाईन हुकलेल्या या महामार्गाच्या टोलवसुलीची डेडलाईन चुकणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महामार्गाच्या कामापेक्षा या टोलप्लाझाच्या उभारणीचे काम अतिवेगात केवळ दोन महिन्यांत पूर्ण करण्यात आले. यावरून टोलवसुलीसाठी किती घाई चालली आहे, हे दिसून येत आहे. याला जिल्ह्यातील राजकीय लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.


टोल वसुलीतून टोल नाक्यापासून १५ किलोमीटरच्या परिसरातील वाहन चालकांना सूट दिली जाणार आहे. यासाठी या वाहन चालकांना टोलनाक्यावर आपल्या वाहनांची नोंद करावी लागणार आहे. त्यानुसारच नाक्यावरुन त्या वाहनाला जाण्यास परवानगी दिली जाईल.


त्यापेक्षा जास्त अंतरातील नागरिकांना टोल भरणे सक्तीचे असेल. यात अधिक पारदर्शकता यावी यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे. टोलवसुलीतील काही बारकाव्यांचा अभ्यास सध्या केला जात आहे. टोल वसुली झटपट व्हावी यासाठी फास्टटॅगचा वापर केला जाणार आहे. यासाठी तीन लेन तयार केल्या जात असून, रोखीने टोल भरणाऱ्यांसाठी एक लेन शिल्लक ठेवण्यात आली आहे. या लेनमधून जाणाऱ्या वाहनांना जर २० रुपये टोल फास्टटॅगने भरावा लागणार होता त्यासाठी साधारण ४० रुपये टोल रोखीने भरावा लागणार आहे. ही आकारणी फास्टटॅगपेक्षा दुप्पट आहे. यातून दुचाकी वाहनांना सूट असणार आहे.



अधिसूचना येण्याची प्रतीक्षा


महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत संपविण्याचे आदेश आहेत. हे काम कल्याण रोडव्हेज या कंत्राटदाराकडून वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एकाच वेळी अनेक ठिकाणी कामे सुरू असून सध्याच्या पावसामुळे त्यात थोडा व्यत्यय आला. हे काम संपल्यानंतर लगेचच टोल वसुली करावी लागेल. टोलवसुली सुरू करण्यासाठी अधिसूचना येणे बाकी आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक (तांत्रिक व प्रकल्प संचालक) यशवंत घोटकर यांनी दिली.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, लवकरच होणार लागू

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आणि

Nitesh Rane: बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर नितेश राणे संतापले, काय म्हणाले वाचा...

सिंधूदुर्ग:  सनातन धर्माने भारताचं वाटोळं केल्याचं बेताल वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे