मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक उड्डाण पूल अपूर्णावस्थेत; टोलवसुलीसाठी मात्र जोरात तयारी

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक उड्डाण पूल अपूर्णावस्थेत असतानाही मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्वात विवादीत कासू ते इंदापूर या ४२.३ किलोमीटर अंतराच्या टोलवसुलीसाठी सुकेळी खिंडीत गाठण्याची तयारी सध्या जोरात सुरु झाली आहे. खिंडीच्या पायथ्याशी भव्य टोलप्लाझा उभारला जात असून, या टोलप्लाझाचे काम अंतिम टप्प्यात आहे.


टोल वसुलीसाठी आता केवळ अधिसूचना निघणे बाकी असून, जानेवारी महिन्यापासून या टप्प्यातील टोल वसुली करण्यास सुरुवात करावी लागेल, असे म्हणणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे आहे. महामार्गाच्या या पहिल्या टप्प्यातील नागोठणे, कोलाड नाका येथील प्रमुख उड्डाण पुलांची कामे अद्याप ४० टक्के देखील पूर्ण झालेली नाहीत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी अपूर्ण कामांमुळे एकेरी वाहतूक सुरु आहे. सध्या पडणाऱ्या पावसामुळे झालेल्या चिखलातून वाहने चालवावी लागत आहेत, अशाच कंबरतोड प्रवासानंतरही कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोल भरावा लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशाने या टप्प्याचे काम यावर्षीच्या डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे; परंतु सध्या सुरु असलेल्या कामाचा वेग पहाता, ही डेडलाईन पुन्हा हुकणार असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक डेडलाईन हुकलेल्या या महामार्गाच्या टोलवसुलीची डेडलाईन चुकणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महामार्गाच्या कामापेक्षा या टोलप्लाझाच्या उभारणीचे काम अतिवेगात केवळ दोन महिन्यात पूर्ण करण्यात आले. यावरुन टोलवसुलीसाठी किती घाई चालली आहे, हे दिसून येत आहे. याला जिल्ह्यातील राजकीय लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.


टोल वसुलीतून टोल नाक्यापासून १५ किलोमीटरच्या परिसरातील वाहन चालकांना सूट दिली जाणार आहे. यासाठी या वाहन चालकांना टोलनाक्यावर आपल्या वाहनांची नोंद करावी लागणार आहे. त्यानुसारच नाक्यावरुन त्या वाहनाला जाण्यास परवानगी दिली जाईल. त्यापेक्षा जास्त अंतरातील नागरिकांना टोल भरणे सक्तीचे असेल. यात अधिक पारदर्शकता यावी यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे. टोलवसुलीतील काही बारकाव्यांचा अभ्यास सध्या केला जात आहे. टोल वसुली झटपट व्हावी यासाठी फास्टटॅगचा वापर केला जाणार आहे. यासाठी तीन लेन तयार केल्या जात असून, रोखीने टोल भरणाऱ्यांसाठी एक लेन शिल्लक ठेवण्यात आली आहे. या लेनमधून जाणाऱ्या वाहनांना जर २० रुपये टोल फास्टटॅगने भरावा लागणार होता त्यासाठी साधारण ४० रुपये टोल रोखीने भरावा लागणार आहे. ही आकारणी फास्टटॅगपेक्षा दुप्पट आहे. यातून दुचाकी वाहनांना सूट असणार आहे.



अधिसूचना येण्याची प्रतिक्षा


महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत संपविण्याचे आदेश आहेत. हे काम कल्याण रोडव्हेज या कंत्राटदाराकडून वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एकाच वेळी अनेक ठिकाणी कामे सुरु असूनस सध्याच्या पावसामुळे त्यात थोडा व्यत्यय आला. हे काम संपल्यानंतर लगेचच टोल वसुली करावी लागेल. टोलवसुली सुरु करण्यासाठी अधिसुचना येणे बाकी आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक (तांत्रिक व प्रकल्प संचालक) यशवंत घोटकर यांनी दिली.

Comments
Add Comment

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय