बर्मिंगहॅम : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मधील भारत - पाकिस्तान सामना रद्द झाला आहे. दोन्ही देशांमधील भू राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा सामना रद्द झाला आहे.
एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला आणि २६ नागरिकांची हत्या केली. या घटनेनंतर भारत - पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मधील भारत - पाकिस्तान सामना रद्द झाला आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मधील भारताचा पुढील सामना मंगळवार २२ जुलै २०२५ रोजी होणार आहे. इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स असा हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजता या सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स 1 या टीव्ही वाहिनीवर सामन्याचे थेट प्रक्षेपण होईल. तसेच फॅनकोड अॅपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. सामना नॉर्थहॅम्प्टन येथे होणार आहे.