Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या वाढदिवशी कुटुंबीय भावुक, आठवणीत वाढदिवस केला साजरा

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला (Vaishnavi Hagawane Suicide Case) आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एका उच्चभ्रू आणि श्रीमंत घराण्यातील महिलांवर बंद दाराआड होत असलेल्या अमानुष छळाच्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही वादळ उमटलेले पाहायला मिळाले. तसेच या संदर्भात वैष्णवीचा नवरा, सासू, सासरा, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. वैष्णवी आत्महत्या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे देखील उघडकीस आले होते. अशा या वैष्णवीचा काल २३ वा वाढदिवस होता. ज्यामुळे तिच्या आठवणीला पुन्हा उजाळा मिळाला.



"माझ्या लेकीला मिसळ खूप आवडायची."


वैष्णवीच्या कुटुंबीयांना तिच्या वाढदिवशी तिच्या आठवणींनी डोळ्यांत अश्रू आले. माध्यमांशी बोलताना वैष्णवीचे वडील भावूक होऊन म्हणाले, “आज ती असती तर तिचा वाढदिवस साजरा झाला असता. ती वाढदिवसाला घरी यायची. माझ्या लेकीला मिसळ खूप आवडायची. आजही तिच्या आठवणी ताज्या आहेत.” हे सांगताना त्यांच्या भावना आवरल्या नाहीत. तिच्या निधनानंतरही कुटुंबीयांनी तिच्या आठवणीत वाढदिवस साजरा केला. वैष्णवीला आवडणारी मिसळ तिच्या फोटोसमोर ठेवत कुटुंबीयांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Comments
Add Comment

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा