Donald Trump health: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘या’ गंभीर आजाराने ग्रासले, व्हाईट हाऊसने केला खुलासा

डोनाल्ड ट्रम्प हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी अ‍ॅस्पिरिन घेतात.


वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना क्रॉनिक व्हेनस इनसफीशियन्सी (Chronic venous insufficiency) असल्याचे निदान झाले आहे. हा आजार नसांशी संबंधित असून वृद्धांमध्ये सामान्य आहे.


या आजारामुळे नसांमध्ये रक्त साचते , असे व्हाईट हाऊस मेडिकल युनिटने सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांना पायांमध्ये सूज आल्याचे लक्षात येताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना या आजाराचे निदान झाले. त्यांना नियमित वैद्यकीय काळजी आणि भरपूर सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचेदेखील त्यांनी पुढे सांगितले आहे.



काय आहे हा आजार?


क्रॉनिक व्हेनस इंसफिशिएन्सी असलेल्या रुग्णांच्या पायांच्या नसा रक्त परत हृदयात योग्यरित्या वाहून नेऊ शकत नाही. रक्तवाहिन्यांमध्ये असणारे लहान व्हॉल खराब झाल्यास रक्त ह्रदयाकडे जाण्याऐवजी परत खाली वाहून पायांमध्ये जमा होऊ शकते. पत्रकार परिषदेत यूएस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी ट्रम्प यांच्या हाताच्या मागील बाजूस जखमांविषयीदेखील सांगितले.


ही सॉफ्ट टिश्यूंची समस्या असल्याचे त्यांनी म्हटले. ही समस्या अ‍ॅस्पिरिन घेतल्याने आणि लोकांशी वारंवार हस्तांदोलन केल्याने उद्भवत असल्याचे त्या पुढे म्हणाल्या. त्यांनी पुढे माहिती दिली की, डोनाल्ड ट्रम्प हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी अ‍ॅस्पिरिन घेतात.



व्हाईट हाऊसने काय सांगितले?


व्हाईट हाऊसने माहिती दिली की, इतर चाचण्यांमध्ये ट्रम्प यांना हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे किंवा यासंबंधित आजाराची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.


पत्रकार परिषदेदरम्यान, त्यांनी स्पष्ट केले की ट्रम्प यांच्या वैद्यकीय तपासणीची माहिती उघड करण्याचा उद्देश राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीबद्दलच्या अलिकडच्या अटकळींना पूर्णविराम देणे आहे. एप्रिलमध्ये, ट्रम्प यांनी अनेक वैद्यकीय तज्ज्ञांकडून शारीरिक तपासणी केली. परंतु, व्हाईट हाऊसने त्यावेळी प्रसिद्ध केलेल्या तीन पानांच्या अहवालात या आजाराविषयी कोणतीही माहिती दिली नव्हती.

Comments
Add Comment

Afghan Foreign Minister Muttaqi India Visit : अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात! संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांचा भर

नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीत दाखल झाले

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या