Shah Rukh Khan : चित्रपटाच्या शूटिंगवेळी बॉलीवूडचा किंग खान जखमी, तातडीने अमेरिकेला हलवलं

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच सर्वांचा लाडका अभिनेता शाहरुख खान एका चित्रपटाच्या शुटिंगवेळी जखमी झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानच्या मल्टिपल मसल इंज्युरीझाल्या आहेत. त्यामुळे उपचारांसाठी किंगखानला अमेरिकेला हलवण्यात आलंय. शाहरुख मुंबईतील गोल्डन टोबॅगो स्टुडिओमध्ये शूटिंग सुरु असताना जखमी झालाय. शाहरुखला गंभीर इजा झाली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकेला नेण्यात आलंय. त्यामुळे चित्रपटाची शूटिंग २ महिने पुढे ढकलण्यात आलीये. सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली सुरु असलेल्या चित्रपटाचं शूटिंग आता २ महिने पुढे ढकलण्यात आलंय.



शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी


प्रोडक्शनशी संबंधित एका जवळच्या सूत्राने माहिती दिली की, “शाहरुख खान यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, फक्त स्नायूंना ताण आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये स्टंट करताना त्यांना अनेकदा दुखापती झाल्या आहेत.” शाहरुखच्या टीमने खबरदारीचा उपाय म्हणून परदेशात उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्यांना उत्तम उपचार मिळू शकतील.



‘किंग’ची शूटिंग थांबवण्यात आली


मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी शाहरुख खान यांना किमान १ महिन्याची संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे 'किंग' चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबवण्यात आले आहे. फिल्म सिटी, गोल्डन टोबॅको आणि वायआरएफ स्टुडिओ यांसारख्या लोकेशन्स जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी बुक करण्यात आल्या होत्या, पण आता पुढील सूचनेपर्यंत त्या बुकिंग्स रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील शूटिंग सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.



किंग खानचा बहुचर्चित 'किंग' चित्रपट


शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘किंग’ या चित्रपटात अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण, अरशद वारसी, अभय वर्मा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, राघव जुयाल, जयदीप अहलावत, सौरभ शुक्ला आणि सुहाना खान यांसारखे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. माहितीनुसार, हा चित्रपट गांधी जयंती २०२६ रोजी प्रदर्शित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.


Comments
Add Comment

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने

चिंतामणीचे सेवेकरी पांडुरंग मोरेंवर आला म्युझिक व्हिडीओ

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरातल्या भाविकांसाठी चर्चेचा विषय असतो. हा गणेशोत्सव उत्साहात साजरा

Shahid Kapoorला हा नाश्ता इतका आवडतो की सातही दिवस तो खाऊ शकतो, मीरा राजपूतने केला खुलासा

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत दोघेही त्यांच्या फिटनेसबद्दल आणि डाएटबद्दल खूप