कराराची अंमलबजावणी १ बँक ऑक्टोबर पासून होणार- पीयुष गोयल यांचे वक्तव्य
प्रतिनिधी: भारतातील महत्वाची घडामोड म्हणजे युके भारत कराराला यशस्वी मोहोर लागली आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी हे कार्यक्रमात बोलताना शनिवारी स्पष्ट केले. मार्च १०,२०२४ तारखेला दोन्ही देशांनी ईफटा (Trade and econ omic partnership agreement EFTA) करारावर स्वाक्षरी केली होती. याविषयी बोलताना गोयल म्हणाले, 'भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना (EFTA) यांच्यातील मुक्त व्यापार करार १ ऑक्टोबरपासून लागू होईल.' करारांतर्गत, भारताला EFTA ग टाकडून १५ वर्षांत १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक वचनबद्धता मिळाली आहे. ज्यामध्ये आइसलँड, लिकटेंस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे. या करारामुळे स्विस घड्याळे, चॉकलेट आणि कापलेले आणि पॉलिश केलेले हिरे यासारख्या अनेक उत्पादनांना कमी किंवा शून्य शुल्कात भारतात प्रवेश करण्याची परवानगी मिळणार आहे. तसेच भारतीय उत्पादनाला संबंधित देशात प्रवेश मिळेल.
कराराच्या अंमलबजावणीनंतर १० वर्षांच्या आत ५० अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि पुढील पाच वर्षांत आणखी ५० अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक वचनबद्धतेमध्ये (Commitment) अंतर्गत विभागले गेले आहे. या वचनबद्धतेमुळे भारतात १० लाख थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे आणि आतापर्यंत भारताने स्वाक्षरी केलेल्या कोणत्याही व्यापार करारात अशा प्रकारचा हा पहिलाच करार असेल. EFTA राष्ट्रांमधून येणाऱ्या अनेक उत्पादनांसाठी भारताने आपली बाजारपेठ खुली केली त्या बदल्यात, ही गुंतवणूक प्रचंड मोठी युरोपियन गुंतवणूक भारतात होए शकते ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे. जवळजवळ १६ वर्षे झालेल्या कराराचा हा मुख्य घटक आहे. या गटातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार स्वित्झर्लंड आहे. उर्वरित देशांशी भारताचा व्यापार आतापर्यंत कमी आहे. करार पूर्ण होण्यास जवळजवळ १६ वर्षे लागली आहेत. भारतासाठी हे खूप मोठे डील म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. भारतासाठी हा करार महत्त्वाचा आहे कारण त्यामुळे EFTA राष्ट्रांच्या अनेक उत्पाद नांसाठी त्याची बाजारपेठ खुली झाली आहे.
युरोपियन फ्री ट्रेड अँग्रीमेंटचे आईसलँड, लिचटेनस्टेन,नॉर्वे, स्वित्झर्लंड हे प्रमुख घटक देश आहेत. भारत त्याच्या ८२.७ टक्के टॅरिफ मर्यादेची ऑफर देत आहे, ज्यामध्ये EFTA निर्यातीच्या ९५.३ टक्के निर्यात समाविष्ट आहे माहितीनुसार, ज्यामध्ये ८० टक्क्यांहून अधिक सोन्याच्या आयात मानली जाते. भारतीय ग्राहकांना घड्याळे, चॉकलेट, बिस्किटे आणि घड्याळे यासारख्या उच्च दर्जाच्या स्विस उत्पादनांची खरेदी कमी किमतीत करणे या कराराच्या माध्यमातून शक्य होईल ज्या सद्यस्थितीत वस्तू भारतीय बाजारपेठेत अ त्यंत महाग किमतीने विकल्या जातात. या वस्तूंवरील सीमाशुल्क १० वर्षांत टप्प्याटप्प्याने रद्द केले जाणार असे सरकारने म्हटले होते.
सेवा क्षेत्रात,भारताने ईफटाला (EFTA) १०५ उपक्षेत्रे देऊ केली आहेत, ज्यात लेखा, व्यवसाय सेवा, संगणक सेवा, वितरण आणि आरोग्य यांचा समावेश आहे. भारताने स्वित्झर्लंडमधून १२८, नॉर्वेमधून ११४, लिकटेंस्टाईनमधून १०७ आणि आइसलँडमधून ११० उप क्षेत्रांमध्ये गुंतवणूक मिळवण्याची कराराच्या बदल्यात वचनबद्धता मिळवली आहे. कायदेशीर, दृकश्राव्य, संशोधन आणि विकास, संगणक, लेखा आणि लेखापरीक्षण सेवा क्षेत्रात फायदा होण्याची अपेक्षा असून असलेल्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक समाविष्ट अ सू शकते. या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युरोपियन युनियनच्या बाजारपेठेत एकात्मिक होण्याची संधी देखील मिळणार आहे . त्यामुळेच या द्विपक्षी कराराला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. स्वित्झर्लंडच्या जागतिक सेवा निर्यातीपैकी ४० टक्क्यांहून अधिक इयुला जातात, ज्यामुळे भारतीय कंपन्या इयु पर्यंत त्यांची बाजारपेठ पोहोचविण्यासाठी स्वित्झर्लंडचा आधार म्हणून वापर करू शकतात. २०२४-२५ मध्ये भारत-EFTA द्विमार्गी व्यापार २४.४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता.